बोरगाव बुट्टी ते सिरसपूर शिवरा रोडची त्वरित उपाययोजना करा- शुभम मंडपे यांची मागणी

30

🔺सार्वजनिक बांधकाम उपविभागाला दिला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.29जुलै):-बोरगाव बुट्टी ते सीरपूर शिवरा रोडवर खूप मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत व या गड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी बोरगाव बुट्टी ते सिरसपूर शिवरा या मार्गाची त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे व सार्वजनिक बांधकाम उपविभागाला निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे व हे रस्तावरील गड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. या रस्ताने बोरगाव बुट्टी व शिवरा-सिरसपूर येथील शेतकरी व शेतमजूर व अन्य प्रवासी जात असतात मात्र या रस्त्याकडे स्थानिक प्रशासनाचे व सार्वांजिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

बोरगाव बुट्टी व सिरसपूर शिवरा रस्त्याची त्वरित उपपयोजना करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याबाबत निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय चिमुर येथे देण्यात आले.यावेळी आंबोली ग्रामपंचायत सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे , सामाजिक कार्यकर्ते मधुकर नागपुरे , सत्यवान नगराळे , रोहित गेडाम व सम्यक चे पदाधिकारी उपस्थित होते व बोरगाव बुट्टी येथील शेतकरी शुभम वाघमारे व सुमित गायकवाड उपस्तीत होते