चेक न वटल्याबाबत आरोपीस शिक्षा व दंड

27

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

बीड(दि.29जुलै):- बलभीम कॉलेज बीड येथील प्राध्यापक बाळासाहेब दगडु लाखे यांनी बीड येथील व्यापारी व प्रशांत ट्रेडर्सचे मालक प्रशांत राजमल बोरा यांचेकडून बांधकामाचे रक्कम रु.१,०५,५१२/- (एक लाख पाच हजार पाचशे बारा रूपये) चे साहित्य खरेदी केले होते.साहित्य खरेदी केले, तेव्हां आरोपीने रू.४५,५१२/- नगदी देऊन उर्वरीत रू. ६०,०००/- चा मराठवाडा ग्रामीण बँकेचा धनादेश दिला होता.

सदरधनादेश फिर्यादीने बँकेत वटण्यासाठी टाकला असता, तो न वटता परत आलेमुळे फिर्यादीने अॅड. सागर नाईकवाडे यांचे मार्फत आरोपी विरुद्ध मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब, बीड यांचे न्यायालयात कलम १३८ एन. आय. अॅक्ट नुसार फौजदारी प्रकरण दाखल केले होते.

सदर प्रकरणात मा. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा पुरावा नोंदवून व कागदोपत्री पुरावा पाहून आरोपी बाळासाहेब दगडु लाखे यांना दोषी ठरवून एक महिना कारावासाची शिक्षा व धनादेश रक्कम व रू.२०,०००/- नुकसान भरपाई फिर्यादीस देण्याचा आदेश केलेला आहे. प्रकरणात फिर्यादीचे वतीने बीड येथील विधीज्ञ अॅड. सागर एस. नाईकवाडे यांनी काम पाहिले.