सावित्रीमाई फुले बहुजन विकास संस्थेतर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान, गरजूंना किराणा किटचे वाटप व वृक्षारोपणाचे आयोजन संपन्न

22

✒️चिंचवड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिंचवड(दि.30जुलै):- पुनावळे येथील सावित्रीमाई फुले बहुजन विकाससंस्थेचे अध्यक्ष राजेश सुरेश ओव्हाळ यांनी उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना किराणा सामानाच्या किटचे वाटप केले .तसेच गेली दीड वर्षे कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सातत्याने लोकांची सेवा केली त्या डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका यांना कोविड योध्दा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. कोरोना महामारी च्या काळात या कोरोना योद्ध्यांनी महत्त्वाची कामगिरी जनतेसाठी निभावली आहे. त्यांच्यासाठी कृतज्ञता म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये प्रभारी वैद्यकीय अधिकारी पुनावळे डॉ. अमित माने, पुजा राठोड, परिचारिका रुपाली गाडेकर, मेघा दुघम, रंजनी भुजबळ, माया यादव, काजल बोरगे, मल्हारी शिरोळे, जालिंदर दर्शिले,कल्पना गायकवाड व संजना तुपे यांना सन्मानित करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीमुळे सर्व उपक्रम सरकारी नियमांचे पालन करून राबविण्यात आले.

याप्रसंगी तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळ माजी सभापती सुहास गरुड , अनुसया ओव्हाळ माध्यमिक विद्यालय संस्थापक अध्यक्ष विश्वास ओव्हाळ,किर्तीरत्न सेवा संघाचे अध्यक्ष विलास ओव्हाळ, सावित्रीमाई फुले बहुजन विकाससंस्थेचे अध्यक्ष राजेश सुरेश ओव्हाळ,रवींद्र ओव्हाळ,अजय ओव्हाळ ,सुहास ओव्हाळ, विजय ओव्हाळ, प्रविण ओव्हाळ ,अमर गायकवाड, रवी वाकचौरे आदी मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती होती.