अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा 2021-22 चे आयोजन

21

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.30जुलै):- केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली प्रतीवर्षी अखील भारतीय नागरी सेवा क्रीडास्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धासाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ, निवड चाचणी घेऊन स्पर्धासाठी पाठविले जातात. राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धासाठी महाराष्ट्र शासनाचा संघ निवडण्याची व त्याचे प्रशिक्षण घेण्याची जबाबादारी सोपविण्यात आलेली आहे.

सदर स्पर्धामध्ये खेळाडूंची शिफारस ही जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्फत होत असल्याने विविध खेळ प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धामधील महाराष्ट्र शासनाच्या संघाची कामगिरी उत्कृष्ट होण्याच्या दृष्टीने टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम, बुद्धीबळ, अॅथलेटिक्स, लघुनाट्य, कबड्डी, वेटलिफ्टींग, पॉवरलिफ्टींग, शरिरसौष्ठव, कुस्ती, लॉनटेनिस, नृत्य व संगित इत्यादी खेळप्रकारात ज्या खेळाडू/कर्मचाऱ्यांना भाग घ्यावयाचा आहे.

अशा खेळाडू/ कर्मच्या-यांनी दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ पूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली, येथे संपर्क साधून विहितनमुन्यातील आवेदन पत्र प्राप्त करुन घेवून कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली, येथे तीन प्रतीत अर्ज आवश्यक प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह सादर करण्यात यावे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली घनश्याम राठोड यांनी कळविले आहे.
****