बाबासाहेब घुगरे यांनी मिळविले 95% टक्के

70

✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.31जुलै):- तालुक्यातील करंजी येथील बाबासाहेब प्रमोद घुगरे हा विद्यार्थी जि.प.उ.प्रा. शाळा करंजी येथून जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा ता. घाटंजी जिल्हा यवतमाळ विद्यालयात येथे नंबर लागला.

इयत्ता 5वी ते 12वी तेथे नाविन्यपूर्ण खेळाडू आणि हुशार विद्यार्थी म्हणून ओळख निर्माण केली असून अतिशय बिकट परिस्थितीतुन त्यांचे आई वडिल सुनिता प्रमोद घुगरे व प्रमोद घुगरे यांनी रोजमजूरी करुन मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी कष्ट केलेले दिसुन येते.

यांना दोन मुले असून मोठा मुलगा राजहंस हा M. B. B. S. ला आहे.लहानपणापासून आजोबाचे छबुराव घुगरे चे शिस्त आणि शैक्षणिक संस्कार मनात रुजलेले होते.आता नुकताच 12 वी चा निकाल लागून 95% गुण घेऊन यश संपादन केले.बाबासाहेब प्रमोद घुगरे यांचे गावात आणि परिसरात कौतुक केले जात आहे. तर यांचे श्रेय आई_वडील ,शिक्षक, व काका -काकु यांना दिले पाहिजे अशा प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी व्यक्त केली.