रणमोचन-खरकाळा रस्त्याची दैन्यीय अवस्था

18

🔸त्वरित खडीकरणासह डांबरीकरण करण्याची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी: ब्रह्मपुरी तालुक्यातील खरकाळा(जुनी वस्ती) तसेच रण मोचन (जुनी वस्तीतून) जाणाऱ्या ह्या रस्त्याची पूर्णता दयनीय अवस्था झाली आहे.सदर रस्त्या वरून दोन्ही गावातील महिला पुरुष व इतर नागरीकांना मार्गक्रमण करताना सायकल व मोटारसायकल तर सोडाच पायदळ येणाऱ्या जाणाऱ्यानां सुद्धा ह्या रस्त्याने जातांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे या मार्गाचे पूर्णता खडीकरण उकडलेले असून रस्त्यावर पूर्णता गिट्टी व चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.सदर रस्त्याचे खडीकरण 10 ते 20 वर्षा अगोदर झाले होते. मात्र
रस्त्याची दुर्दशा बद्दल कोणीच मात्र पुढे सरसावताना दिसत नाहीत.

वारंवार याबाबत वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित करण्यात आल्या मात्र प्रकाशित बातमी कडे कोणत्याही प्रकारची दक्षता न घेता दुर्लक्ष करण्यात आले. सदर जिल्हा परिषद क्षेत्रात येणाऱ्या अथवा लोकप्रतिनिधींनी याकडे त्वरित लक्ष घालून हा रस्ता त्वरित दुरुस्त करून डांबरीकरण करावे अशी मागणी आता खरकाळा – रनमोचन येथील नागरिकांनकडुन होत आहे.