आश्रम शाळेचा लाचखोर मुख्याध्यापक एसीबी जाळ्यात

23

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.31जुलै):- सातव्या वेतन आयोगाचा फरक काढून दिल्याच्या मोबदल्यात सहकारी कर्मचाऱ्याकडून बक्षिस म्हणून पाच हजार रूपयांची लाच स्विकारणाऱ्या पिंपरखेड (ता. दिंडोरी) येथील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकास अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) पथकाने बेड्या ढोकल्या. ही कारवाई नाशिक शहरातील मेरी लिंक रोड भागात करण्यात आली.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दामू कळसाईत असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. संशयित मुख्याध्यापक आणि तक्रारदार हे दोघेही पिंपरखेड शासकीय आश्रमशाळेत कार्यरत आहेत. तक्रारदार यांना काही दिवसांपूर्वीच सातवा वेतन आयोगाचा फरक मिळाला. या कामासाठी मदत केल्याचा दावा करीत मुख्याध्यापक कळसाईत याने बक्षिस म्हणून सहा हजार रूपयांची मागणी केली.तडजोडी अंती हा व्यवहार पाच हजारावर निश्चीत करण्यात आला. मात्र तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला.

नाशिक शहरातील मेरी लिंक रोडवरील अंबिका सुपर मार्केट समोरनाशिक – सातव्या वेतन आयोगाचा फरक काढून दिल्याच्या मोबदल्यात सहकारी कर्मचाऱ्याकडून बक्षिस म्हणून पाच हजार रूपयांची लाच स्विकारणाऱ्या पिंपरखेड (ता. दिंडोरी) येथील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकास अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) पथकाने बेड्या ढोकल्या. ही कारवाई नाशिक शहरातील मेरी लिंक रोड भागात करण्यात आली.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दामू कळसाईत असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे.

संशयित मुख्याध्यापक आणि तक्रारदार हे दोघेही पिंपरखेड शासकीय आश्रमशाळेत कार्यरत आहेत. तक्रारदार यांना काही दिवसांपूर्वीच सातवा वेतन आयोगाचा फरक मिळाला. या कामासाठी मदत केल्याचा दावा करीत मुख्याध्यापक कळसाईत याने बक्षिस म्हणून सहा हजार रूपयांची मागणी केली.तडजोडी अंती हा व्यवहार पाच हजारावर निश्चीत करण्यात आला. मात्र तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला.नाशिक शहरातील मेरी लिंक रोडवरील अंबिका सुपर मार्केट समोर पंच व साक्षीदारांच्या समक्ष कळसाईत याने पैसे घेतले त्याचवेळी त्याला एसीबी च्या पथकाने पकडले अधिक तपास एसीबी करीत आहे