आरोग्य सेविकेची पाठराखन करणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करा- जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनातून मागणी

28

🔺अन्यथा १५ऑगस्ट जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

✒️गडचिरोली,जिल्हा प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.1आगष्ट):-आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका हि वारंवार डिलिवरी पेशंटची हयगय केल्याने तात्काळ येथील आरोग्य सेविकेला निलंबित करण्यात यावे यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांच्याकडे पाथरगोटा येथील नागरीकांनी केली असता अजुन पर्यंत कोणतीही कारवाई न करता उलट त्या आरोग्य सेविकेची जिल्हा आरोग्य अधिकारी पाठराखण करीत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा १५ आगस्ट स्वात्र्यत दिनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून दिला आहे.

या अगोदर निवेदन दिल्याने दि 24 मार्च ला तालुका आरोग्य अधिकारी टिकरे यांनी पाथरगोटा येथील आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणल्या यात पाथरगोटा येथील आरोग्य सेविकेचा निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडे सादर केला होता, तालुका आरोग्य अधिकारी टिकरे यांनी निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांच्या कडे पाढविला होता यावरुन जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांनी पाथरगोटा येथील आरोग्य सेविकेला कारने दाखवा नोटीस बजावून दोन दिवसात उत्तर मागवीला होता.
परतु जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचारी तो नोटीस तामिल न करतात आपल्या फाईल मध्येच जवळपास दिड महीण्यापासुन आपनाकडेच प्रलंबित टेवले यावरुन वारंवार विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत होती या वरुण जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन पाथरगोटा येथील आरोग्य सेविकेच्या निलंबनाचे काय झाले असे विचारणा केली असता पाथरगोटा येथील आरोग्य सेविकेवर कधीचीच कारवाई झाली.

अधिक माहीती संबंधित कर्मचाऱ्यांना विचारा असे सांगीतले असता संबंधित जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता वैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाथरगोटा आरोग्य सेविका निलंबन प्रकरण नोटीस देण्यात आले आहे.परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आशीर्वादाने आरोग्य सेविकेची निलंबनाची कारवाई झाली नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केलेली निलंबनाची थातुरमातुर चौकशी संशयाच्या भोवऱ्यात असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीच पाथरगोटा येथील आरोग्य सेविकेचा निलंबनाचे प्रकरण दाबल्याने, कार्यवाही त्यावरच सुद्धा करण्यात यावी अन्यथा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून दिला आहे.