बेकायदेशिररित्या ऑनलाईन जुगाराचे सक्रिय रॅकेट शोधुन काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

27

✒️गडचिरोली,जिल्हा प्रतिनिधी(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.1ऑगस्ट):-तरुणपिढी मोठया प्रमाणात मोबाईलच्या आहारी गेलेली असून रात्रंदिवस सोशल मिडीयाचा वापर करीत असते व त्या ब्दारे विविध प्रकारचे गुन्हेगारी वाढत असल्याने अशा प्रकारच्या गुन्हेगारांची माहिती काढुन त्यावर कारवाई करणे बाबतचे आदेश मा.पोलीस अधिक्षक गडचिरोली यांनी दिलेले आहेत.

अशाच प्रकारे ऑनलॉईन जुगार खेळणारे रॅकेट गडचिरोली जिल्हयात सक्रिय असल्याबाबतची गोपनीय माहीती मिळाली होती. त्याअनुषंगाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ३० जुलै २०२१ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व त्यांच्या टिमने आष्टी परिसरातील छगन मठले, राजू धर्माडी,मनोज अडेट्वार, द्राव्यराव चांदेकर, सुमित नगराळे आणि अहेरी आलापल्ली परिसरातील सुरेंद्र शेळके, संदिप गुदपवार यांना चौकशी करता बोलवले. चौकशी दरम्यान वरील सर्व इसम हे Bets 1. co आणि nice.7777.net या बेकायदेशिर ऑनलाईन जुगार प्लॅटफार्मच्या माध्यमातुन
क्रिकेट, फुटबॉल आणि इतर बॉबी संबंधी बुकी म्हणुन काम करत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चंद्रपूर येथील राकेश कोंडवार, रजीक अब्दूल खान,महेश अल्लेवर हे चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये या बेकायदेशिर ऑनलाईन सट्टा प्लॅटफार्मचे मुख्य वितरक युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातुन एजंट/क्लायंट तयार करतात अशी माहिती समोर वरील सर्व आरोपी यांचे विरुध्द अहेरी पोलीस ठाणे गु.र.न.२३५/२०२१ भा.द.वि. कलम ४२०,४६५,४६८,४७१ सह कलम जुगार अधिनियम तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला असुन वरील सर्व आरोपी यांना गुन्हयामध्ये अटक करण्यात आलेली आहे. नमुद आरोपी यांचेकडुन ऑनलाईन जुगाराकरीता वापरण्यात येणारे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

सदर ऑनलाईन जुगाराचे मोठे राज्यस्तरीय रॉकेट कार्यरत असल्याचे दिसत असून, त्या दृष्टीने पोलीस अधिक तपास करीत आहेत.असून, ते सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा., अपर पोलीस अधीक्षक(अहेरी) श्री. मनिष कलवानिया, अपर पोलीस अधिक्षक श्री समीर शेख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर, नापोशि मनोज कुनघाडकर,पोशि विश्वनाथ उडाण, पोशि वडजु दहीफळे, नापोशि श्रीकांत भांडे, नापोशि नितीन पाल, पोशि सुरज करपते, पोशि उध्दव पवार, पोशि बेगलाजी दुर्गे यांनी पार पाडली.