आष्टी येथे भीमसेन धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध स्पर्धा व विविध कार्यक्रमांचे आयोजन

24

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.1ऑगस्ट):- शहरातील भगवान महाविद्यालयामध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमसेन धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि.४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता भव्य खुल्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचे नियोजन करण्यात आलेले आहे.यामध्ये प्रथम १००१ रुपये,द्वितीय ७०१ रुपये,तृतीय ५०१ रुपये आणि उत्तेजनार्थ ३०१ रुपये बक्षीस ठेवण्यात आलेले आहे.

विजेत्या स्पर्धकांचे बक्षीस वितरण ५ आँगस्ट रोजी म्हणजेच माजी आ.भीमसेन धोंडे यांच्या वाढदिवसादिनी सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.या रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी स्पर्धेच्या दिवशी नियोजित वेळेत आपल्या स्वतःच्या रांगोळीसह महाविद्यालयात उपस्थित राहावे.

माजी आ.भीमसेन धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या रांगोळी,शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी रस्सीखेच स्पर्धा,सांस्कृतिक विभाग काव्यावाचन,धोंडे साहेब हस्ते घनवन संकल्पना लागवड,विज्ञान विभागाचेवतीने पोस्टर प्रेझेंटेशन पर्यावरण संवर्धन कार्यक्रम व विविध स्पर्धा होणार आहेत.जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.