राजू चव्हाण यांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघ चाचणी साठी निवड

21

✒️नवनाथ पौळ(बीड,अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.1ऑगस्ट):-सप्टेंबर ऑक्‍टोबरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड होणार आहे.त्यामध्ये बीड तालुक्यातील नाळवंडी येथील लक्ष्मी आई तांड्यावर राहणारा राजू चव्हाण यांची निवड झालेली आहे.भारत व बांग्लादेश यांच्यामध्ये एक कसोटी,तीन वन डे,आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे.अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रचंड मेहनतीने राजू चव्हाण यांनी क्रिकेट खेळणे हा छंद जोपासला.अनेक टूर्नामेंट्स मध्ये त्यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून सर्वोत्कृष्ट कामगिरी ही सिद्ध केलेली आहे.

याचेच फलित म्हणून भारतीय दिवांगत क्रिकेट संघाने त्यांचे दिनांक चार ऑगस्ट पासून होणाऱ्या चाचणी कॅम्पसाठी निवड करून नियुक्ती पत्र देखील दिलेली आहे.राजू चव्हाण यांच्या नेत्रदीपक यशाचे कौतुक व हृदय सत्कार बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ.गणेश खेमाडे यांचे सह प्रा.भास्कर पिंपरीकर,ईंजी.शरद वीर,प्रा. शंकर वाघमारे,नंदकिशोर वाटुरे,प्रा.शिवाजी सोनवणे प्रा.विनोद सोनवणे, गणेश खोपे, डोंगरदिवे सर यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.