महापुरुषांच्या विचारावर वाटचाल ही काळाची गरज- शिवाजी शिरसाठ

27

✒️राहुल कासारे(आंबेजोगाई प्रतिनिधी)मो9763463407

अंबेजोगाई(दि.1ऑगस्ट):-महापुरुषांचे विचार आपल्या जिवणात नेहमीच प्रेरणादायी आहेत. आपली वाटचाल ही त्यांच्या विचारांवरच असली पाहिजे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजी शिरसाठ यांनी व्यक्त केले. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथील लहुजी नगर येथे लोकशाहीर साहित्यरत्नं अण्णाभाऊ यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर ज्ञानोबा जाधव, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, पं. स. सदस्य मच्छिंद्र वालेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास घोळवे, हनुमंत गायकवाड, मारुती माने, वसंत उधार, प्रा. नरसिंग उधार, पांडुरंग मस्के, भास्कर जाधव, कमलाकर मिसाळ, अरविंद मिसाळ, श्रीमंत शिंदे, अशोक मस्के, पाराजी वैद्य, गोविंद केंद्रे, संजय रानभरे, राहुल कासारे, अविनाश भारती, गणेश जाधव, बालासाहेब राजमाने यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवाजी शिरसाठ यांनी पुढील भाषणात बोलत असताना आपण जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणार असल्याचं मत व्यक्त करत अण्णाभाऊ साठे सभागृह व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह हे बांधून देण्याचे आश्वासन दिले व पुढील जयंती उत्सव कार्यक्रम हा सभागृहातच होईल असेही सांगितले.

त्यानंतर प्रा. नरसिंग उधार यांनी आपले विचार मांडत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे वाचन करून नवीन पिढीने त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवावा असे अमूल्य मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता केली. सूत्रसंचालन सुरेश मिसाळ यांनी केले.