मुस्लिम बांधवांनी मशिदीतून केली पुरपिडीतांसाठी 61 हजार रुपये वर्गणी जमा

27

🔹जमाते इस्लामी हिंद, युथ विंग, एसआयवो चा पुढाकार

✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो.9823995466

उमरखेड(दि. 2ऑगस्ट):- 2021 रोजी जमाते इस्लामी हिंद शाखा उमरखेड तर्फे शहरातील विविध मशिदीतून मुस्लिम बांधवांनी कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी 61 हजार रुपयांचा मदतीचा हात दिला आहे.

जमाते इस्लामी हिंद ही भारतामध्ये मागील 75 वर्षांपासून सद्भावना,प्रेम,बंधुत्व, इस्लाम व मुसलमानाविषयी असलेले गैरसमज वा मुद्दामहुन पसरविली जाणारी द्वेषभावना दुरकरण्यासाठी इस्लाम धर्माची माहीती,प्रचार ,प्रसार ,जनसेवा तसेच नैसर्गिक आपत्ती वेळी लोकांच्या मदती साठी धावणारी संस्था आहे.

संघटनेने मागील वर्षी कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी तीस घरे निर्माण करून दिले होते .आज कोकण -पश्चिम महाराष्ट्रातील महाड, चिपळूण, सांगली, सातारा, इत्यादी गावांमध्ये पाण्यामुळे निर्माण झालेली स्थिती बघता, जमात-ए-इस्लामी हिंदची आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्ट ( आयआरसीटी )च्यावतीने आज उमरखेड शहरामध्ये मशिदीतून लोक वर्गणी जमा करण्यात आली. लोकांनी भर पुर प्रतिसाद दिला.

स्टुडेन्ट इस्लामीक आर्गनायझेशन ( एसआय वो ), युथ विंग,जमाते इस्लामी हिंदचे कार्यकर्ते विविध मशिदीसमोर “भाई, पुरामुळे संकट कोसळणाऱ्या लोकांची मदत करा “तुम जमीनवालो पर रहम करो, आसमानवाला तुम पर रहम करेगा ” असे घोषणा देत , हातात मदतीचे डबे घेऊन मस्जिदी समोर उभे होते.

स्थानिक अध्यक्ष काझी जहिरोद्दीन यांनी आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्ट .खाते क्रमांक – 30026552256 आयएफसी कोड – एसबीआयएन -0001835 या अकाउंटवर आपले चेक, ड्रॉप, आरटीजीएस पाठवून पुरग्रस्तांची भरपुर मदत करण्याचे आवाहन केले.