अत्यंत निर्दयी- झाड कापल्याने पंधरापेक्षा अधिक बगळ्यांच्या पिलांचा मृत्यू

24

🔸वृक्ष आणि पर्यावरण प्रेमी संतप्त

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.2ऑगस्ट):-शहरात एक अत्यंत नवोदय घटना समोर आली आहे. नाशकात वेळोवेळी वृक्षतोडीचे प्रकार समोर येतात. अनेकदा त्याची दखल घेतली जातेच असे नाही. त्यामुळे शहरातील वृक्ष आणि पर्यावरण प्रेमींचा रोष महापालिका व पोलिसांना सहन करावा लागतो. आताही अत्यंत संतापजनक घटना घडली आहे.गंगापूररोडवरील डीके नगर मध्ये महापालिकेच्या ठेकेदाराने एक झाड कापले. मात्र, या झाडाच्या फांदीवर बगळ्याचे घरटे होते. या घरट्यात १५ हून अधिक बगळ्यांची पिल्ले होती. झाड तोडतेवेळी फांद्या कापल्याने हे घरटे आणि पिले रस्त्यावर कोसळली. त्यात या पिलांच्या अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला आहे. अनेक पिलेही जखमी झाली आहेत. स्थानिक नागरिकांनी महापालिककडे तक्रार दिली होती.

त्यानंतर खाया प्रजातीच्या या झाडावर कुऱ्हाड चालविण्यात आली.मात्र, झाड तोडतेवेळी त्यावर पक्षी किंवा प्राणी आहेत याची कुठलीही खातरजमा करण्यात आली नाही. सर्रास कुऱ्हाड चालविल्याने निष्पाप बगळ्यांचा आणि पिलांचा जीव गेल्याचा आरोप करीत वृक्ष व पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी सखोल आणि निष्पक्ष चौकशी महापालिकेने करावी.
पोलिस आणि मनपा या दोघांनीही दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. याची काही दखल महापालिका आणि पोलिस घेणार का आणि मृत बगळ्यांना योग्य ती श्रद्धांजली वाहिली जाणार का, असा संतप्त सवालही पक्षी व प्राणीप्रेमींनी केला आहे.