नाकारलेल्या समूहाचे जग बदलायचे असेल तर आंबेडकरी विचाराचे घाव घालावेच लागतील – माजी आमदार विजयराव खडसे

20

✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी उमरखेड)मो.9823995466

उमरखेड(दि. 2जुलै):-उपेक्षित वंचित दलित आदिवासी या साऱ्या नाकारलेल्या समूहाचे जग बदलायचे असेल तर आंबेडकरी विचाराचे घाव घालावेच लागेल तरच समाजाचा विकास होईल म्हणूनच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी ‘जग बदल घालुनी घाव, मज सांगून गेले भीमराव ‘हा संदेश समाजाला दिल्याचे प्रतिपादन माजी आमदार विजयराव खडसे यांनी केले.

ते सुमेध बोधी बुद्ध विहार समितीच्या वतीने आयोजित साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्यात अध्यक्षस्थानाहून बोलत होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पॅंथर डी.एस. ससाने हे होते. त्यांनी सर्व मागासवर्गीय समाजाने एक होऊन डॉ.बाबासाहेबांच्या विचाराला स्वीकारले पाहिजे तरच आपला विकास होईल अन्यथा आपण अहो तिथंच राहून दारिद्र्यात खितपत पडून असे प्रतिपादन केले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा नियोजन समितीचे नवनियुक्त सदस्य नगरसेवक संदीप ठाकरे, डॉ. राजू जोगदंड ज्येष्ठ पत्रकार राजू गायकवाड, दत्तात्रय काळे ,कृष्णा लांबटिळे, यांच्या सह रामराव वाठोरे,डॉ.प्रेम हनवते, पत्रकार शाहरुख पठाण, राहुल काळबांडे ,राम कांबळे, वीरेंद्र खंदारे, दिलीप कांबळे ,साहेबराव कांबळे, वसंतराव भरणे ,महिला मंडळ च्या केसरबाई पाईकराव ,अनिता पाटील, नीता दामोदर, प्रतिभा सोनुले ,शारदा निथळे, शांताबाई कांबळे विश्वंभर भुकतारे हे उपस्थित होते.सुरुवातीला महिला मंडळाच्या वतीने त्रिशरण पंचशील देण्यात आले त्यानंतर कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन दामोदर तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अनिल काळबांडे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिव भीमराव सोनुले ,संतोष निथळे ,उत्तमराव शिंगणकर, राहुल काळबांडे या सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.