वर्षावास निमित्ताने भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे वाचन सुरू!

29

✒️सिध्दार्थ दिवेकर(उमरखेड,तालुका प्रतिनिधी)मो:-9823995466

उमरखेड(दि.3ऑगस्ट):- दि. 2 अगस्ट 2021 सम्यक बौद्ध विहारामध्ये दररोज ग्रंथ वाचुन प्रवचन केले जाते.तथागत भगवान बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण व अभिवादन करून सुरू करण्यात येतो.तसेच भदंत कीर्ती बोधी हे “भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म” हा ग्रंथा ची धम्मदेशना सांगण्यास सुरुवात करतात.बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकांच्या कल्याणकरिता भगवान बुद्धाची सारनाथ येथे पंचवर्गीय भिक्कुना प्रथम उपदेश केला.

त्यालाच ‘धम्मचक्र प्रवर्तण सुत्ताचा दिन’ असे म्हणतात.
याच दिवसा पासून श्रावक संघाच्या वर्षावासाची सुरुवात केली.
तेव्हा पासून भिक्कु संघ आपापल्या विहारात उपासक उपसिकांना भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म याचा उपदेश करतात.आज पासून तीन महिने पर्यन्त उपोसथ व्रताचे काटेकोर पालन करतात. म्हणून तेव्हा पासून अश्विन महिन्या पर्यन्त हा ग्रंथ वाचवा लागतो.

“भवतु.. सब्ब.. मंगल..”
“मंगल हो… मंगल हो…”

शेवटी असे मंगलसूत सांगून आजच्या धम्मदेशनेचा समारोप केला.

यावेळी कुमार केंद्रेकर, सिध्दार्थ दिवेकर, जिजाबाई दिवेकर, हिराबाई दिवेकर, भारता दिवेकर, जाणकाबाई इंगोले, यशोदाबाई दिवेकर, ज्योतीताई इंगोले, उषाताई इंगोले, आनंदाबाई दिवेकर, सुभद्राबाई पाईकराव, शांताबाई दिवेकर, यशोधरा धबाले, प्रफुल दिवेकर,तुषार पाईकराव उपस्थित होते.