ग्रामीण भागातील बस फेऱ्या सुरु करा- शिवसेना महिला संघटीका सिंधुताई जाधव यांची मागणी

23

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.4ऑगस्ट)::-सध्या लाॅकडाउन असल्यामुळे जिवती तालुक्यातील बस सेवा पुर्णता बंद केल्या मूळे त्याचा फटका ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजुर व सामान्य नागरिकांना बसत आहे. कारण जिवती तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध कामा करीता,शेति निविष्ठा खरेदी,आरोग्या करिता दवाखाना तसेच शेतमाल व धान्य विक्री,विविध कामा करीता गडचांदूर येथे जाणे-येणे करावे लागते, बस सेवा बंद असल्यामुळे सदर बाबीचा फटका फक्त शेतकरी व शेतमजुरास व सामान्य नागरिकास बसलेला आहे.

कारण सामान्य माणसाजवळ स्वतःचे वाहन नसल्यामुळे शेतकरी वर्गाला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे तसेच सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे दोन चाकी वाहनानि जाने-येणे करू शकत नाही.करीता एस.टी. महामंडळा मार्फत गडचांदूर ते पाटण मार्ग जिवती व गडचांदूर ते नगराळा मार्ग जिवती याप्रमाणे बस सेवा तातडीने सुरू करावि अशी मागणी, शिवसेना महिला संघटीका तालुका जिवती सिंधुताई जाधव यांनी जिल्हा अधिकारी चंद्रपुर यांना निवेदन देवून केलेली आहे.