पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

27

पाकिस्तान सध्या भीषण दिवाळखोरीतून जात आहे. पाकीस्तानची आर्थिक घडी पूर्ण विस्कळीत झाली आहे. पाकिस्तानमधील महागाईने कळस गाठला आहे. जीवनावश्यक वस्तू देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. महागाईने तेथील जनता मेटाकुटीला आली आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली आहे की पाकिस्तान आर्थिक दिवळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. मोठ्या आर्थिक संकटातून जाणाऱ्या पाकिस्तान सरकारकडे देश चालवायला देखील पैसे नाहीत. तेथील आर्थिक परिस्थिती इतकी बिघडली आहे की पंतप्रधान निवासस्थान भाड्याने देण्याची वेळ तेथील सरकारवर आली आहे. पाकिस्तानमधील समा टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमधील सत्तारूढ पक्ष तहरिक पाकिस्तान तहरिक ए इन्साफ या पक्षाने २०१९ मध्ये पंतप्रधान निवासस्थान एका विद्यापीठात बदलण्याची घोषणा केली होती. त्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी ते निवासस्थान रिकामं केलं आहे.

पण आता या योजनेत बदल करण्यात आला असून विद्यापीठाऐवजी ते आता सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न, शैक्षणिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमासाठी भाड्याने देण्याचा निर्णय इम्रान खान यांनी घेतला असून यातून जमा होणारे उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा होणार आहे. त्यासाठी दोन सदस्यांची समितीही नेमण्यात आली आहे. देशाची तिजोरी भरण्यासाठी पंतप्रधान निवासस्थान भाड्याने देण्याची जगाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. इतकी नामुष्की आजवर कोणत्याच देशावर आली नव्हती. या घटनेने पाकिस्तानची संपूर्ण जगभर नाचक्की झाली आहे अर्थात याला पाकिस्तानच जबाबदार आहे. आज पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोमात आहे. पाकिस्तानची तिजोरी रिकामी आहे कारण पाकिस्तानमधील आजवरच्या सर्व पंतप्रधानांनी देशाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. जनतेकडून कर रूपाने गोळा होणारा पैसा त्यांनी देशासाठी न वापरता दहशतवादी संघटनांकरिता वापरला. जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याऐवजी पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना पैसे आणि शस्त्रे पुरवले.

भारतात आणि त्यातही जम्मू काश्मीरमध्ये अस्थैर्य माजवण्यासाठी त्यांनी देशाची तिजोरी रिकामी केली त्याच्याच परिणाम म्हणून आज अशी अवस्था झाली आहे की पाकिस्तानच्या जनतेला जीवनावश्यक वस्तू देखील हे सरकार पुरवू शकत नाही. पाकिस्तान कायम चीन आणि अमेरिकेच्या भिक्षेवर जगत आला आहे. चीन आणि अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक मदत केली आहे त्याच आर्थिक मदतीवर पाकिस्तान जगत आला आहे पण गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने पाकिस्तान बाबतच्या धोरणांत बदल केला असून अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत कमी केली आहे त्यामुळे पाकीस्तानला मोठा आर्थिक फटका बसला आहे. होता नव्हता तितका पैसा पाकिस्तानने दहशतवादी संघटनांना पुरवला आज अशी वेळ आली आहे की पाकिस्तान अक्षरशः भिकेला लागला आहे.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५