दिपक भाई केदार यांच्यावरील भ्याड हल्लाच्या निषेधार्थ धारूर तहसीलदार यांना निवेदन

29

🔹दगडफेक करणार्या प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ अटक करण्याची केली मागणी

✒️नवनाथ पौळ(बीड,अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.4ऑगस्ट):-परभणी जिल्ह्यातील सेलू येथे मनुवादी समाजकठकांनी आॅल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिपक भाई केदार यांच्या गाडीवर भ्याड हल्ला केल्याबद्दल येथे तहसीलदार तहसिल कार्यालय धारूर यांना निवेदन देण्यात आले.ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार कार्यक्रमाला जात असताना सेलू येथील मनुवादी जातिवाद्यांनी अमांनुषपणे दगडफेक केली .त्यात परभणीचे जिल्हा अध्यक्ष लढावु पँथर भिमराज गोठे हे गंभीर जखमी झालेले आहेत.तरी ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे.म्हणून ऑल इंडिया पँथर सेना धारूर तालुका याच्या वतीने या घटनेचा जाहिर निषेध करते.

आरोपींना तात्काळ करण्यात यावी व त्यांच्यावर कठोर कारवाई यावी अन्यथा येत्या काही दिवसात मा. दिपक भाई केदार साहेबांच्या आदेशानुसार सर्व आंबेडकरी पक्ष सघंटना यांच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्र बंद व रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.आसा ईशारा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतिने देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित . ऑल इंडिया पँथर सेना गोविंद उजगरे मराठवाडा सघंटक राकेश सिरसट तालुका युवा अध्यक्ष उमेश उजगरे युवा नेता पँथर ऋषीकेश उघडे विश्वास वाव्हुळे जिल्हा सघंटक किरण ऑल इंडिया पँथर सेना तालुका महासचिव कृष्णा झोटिंग सदस्य ऑल इंडिया पँथर सेना.