ग्रामीण लोककला विकास मंडळाच्या वतीने गावोगावी जाऊन जनजागृती कार्यक्रम सादर

22

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.4ऑगस्ट):-दिनांक 03ऑगष्ट 2021रोज मंगळवारीमौजे सुप्पा,ईसाद आणि राणिसावरगाव या तीन गावात प्रत्यक्ष जाऊन ग्रामीण लोककला विकास मंडळाचे सुग्रीव पैठणे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत सकाळी, दुपारी जनजागृती कार्यक्रम आयोजित करून आपल्या कलेच्या माध्यमातून लोककला, पथनाट्य, गीत गायनाच्या माध्यमातून रमाई घरकुल योजना,भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार,कन्यादान योजना,मुलां-मुलीसाठी शासकीय वसतिगृहे आदी योजनांची माहिती दिली.

कलापथकामध्ये सुग्रीव पैठणे,शाहिर सुभाष साबळे, नाट्य कलावंत राहूल साबणे, पेटीवादक विनायक वाहूळे,संपत वाघमारे, नरसिंग वाघमारे,दगडु ढवळे शिवनाथ तोडकरे कौशल्याबाई रायबोले, मनोहर पैठणे सहभागी होते. व तसेच सरपंच सौ चित्राताई राजेभाऊ कांबळे, योगेश गायकवाड, लक्ष्मण घोबाळे, कैलास कांबळे, बाबासाहेब कांबळे,अमोल चक्र रे, संतोष गायकवाड, मुक्ताबाई भालेराव,वसंताबाई भालेराव, नरेंद्र भालेराव, परमेश्वर पंडित, आकाश साळवे,अर्यन पंडित, मिलिंद कांबळे,पुजा साळवे,शिवराम नागरगोजे,महानंदा साळवे,दिपक रायबोले, दगडु रायबोले ,सुध्दाकर रायबोले, गंगाबाई रायबोले,संदिप भालेराव, लक्ष्मण साळवे आदी महिला, पुरुष व युवकांनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.