आक्रोश शोषितांचा

झकास सुट वाले,
भकास वाटू लागले..!
नेते सर्रास साले,
पायास चाटू लागले..!

गुलाम स्वार्थी चेले, 
लबाड धुर्त झाले..! 
काबाड कष्ट वाले,
सारेच मृत झाले..!

आक्रोश शोषितांचा, 
शासन बधिर झाले..!
देण्यास कर्ज व्याजी,
सावकार अधिर झाले..!

कुणाकडे आता ही ,
कैफियत मांडू मी..! 
पुरता पोरका झालो,
माझ्याच देशात मी..!

सारे लुटारूंचे वंशज, 
करू भरोसा कुणावर..!
झाली बरबाद पिढी, 
जगवू किती ऋणावर..!

न्यायाची हाक जेंव्हा, 
काफिल्यात करतो मी..!
सरकारी दप्तरात, 
देशद्रोही ठरतो मी..!

✒️शब्दांकन:-भीमटायगर पंजाबराव कांबळे(यवतमाळ)मो:-9850342588

महाराष्ट्र, यवतमाळ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED