कास्ट’ची नव्हेतर ‘क्लास’ची लढाई लढूया-प्रा.लक्ष्मण हाके

28

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.5ऑगस्ट):-जाती पातीच्या धर्मा धर्माच्या संघटना निर्माण करुण कास्टच्या लढाईत वेळ घालवण्यापेक्षा इथून पुढे क्लासची लढाई लढुया आज पंचायत राज्य मंडल आयोगावर संकट आलंय भविष्यात शिक्षण,नोकरीतील आरक्षण बंद होऊ शकते यासाठी ओबीसी व भटक्या विमुक्तांनी जागृत होण्याची गरज आहे असे मत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे नुतन सदस्य प्रा. लक्ष्मण हाके यांनी म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ प्रमोद गावड़े यांनी केलेल्या सत्कारा दरम्यान व्यक्त केले.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या ३४०व्या कलमाच्या माध्यमातुन ओबीसी ,भटक्या विमुक्त जाती जमातींना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थीक आरक्षनातुन प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली होती त्या आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे व इतर ९ सदस्य असुन या आयोगात प्रा लक्ष्मण हांके यांनी नियुक्त झाली त्यानिमित्ताने त्यांचा म्हसवड येथे सत्कार सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ प्रमोद गावड़े करुन माणदेशी ओळख असलेली घोंगडी देवून सत्कार करण्यात आला यावेळी पालिकेचे उपनगराध्यक्ष दीपक बनगर, सोमनाथ कबीर, मुसाभाई शेख, तानाजी वीरकर, नीलेश जानकर प्रमुख उपस्थित होते.

सत्कारास उत्तर देताना प्रा. हाके म्हणाले, “ओबीसी व भटके विमुक्तांच्या राजकारणातील भूमिका महत्त्वाची असून जाती संघटनां मध्ये न अडकता या समुदायाने आपला संविधानिक अधिकार प्राप्त करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. माणदेश हे भटके विमुक्त,ओबीसी चळवळीचे प्रमुख केंद्र आहे.ओबीसी आणि भटके विमुक्त बांधवांनी या चळवळीत सहभागी होऊन न्याय हक्कासाठी एकत्र यावे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या३४० कलमा नुसार भटक्या विमुक्तांसह ओबीसीना प्रवाहात आणण्यासाठी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणारे देशातील पहिले नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर होते मात्र आज याच मंत्रीपदासाठी प्रत्येक नेता आपल्याच समाजाला कोणत्या तरी पक्षाच्या दावणीला बांधून स्वतासह नातेवाईकांची घरे भरताना दिसत आसुन ही हां भोळाभाबडा अशिक्षीत कमी शिक्षण असलेले समाज बांधव डोळे झाकुण त्यांच्या मागे जात आहे.

हि खेदजनक गोष्ट आहे आत्ता तरी माझ्या समाज बांधवांनी जागृत व्हावे जाती पातीच्या संघटना पक्ष निर्माण करुण कास्टच्या लढाईत वेळ घालवण्यापेक्षा प्रत्येक नेत्याने कार्यकर्त्यानी क्लासची लढाई लढण्यासाठी ओबीसीं व भटक्या विमुक्त जातीतील सर्व संघटना पक्ष यांनी एकत्र येवून लढाई उभारण्याची गरज निर्माण झाली आहे माझी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य पदी निवड झाल्यापासुन महाराष्ट्रभर त्या अनुशंगाने फिरत आसल्याचे प्रखड मत राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके यांनी म्हसवड येथे ओबीसी व भटके विमुक्तांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी भेटून संवाद साधताना बोलत होते.