कुंडलवाडी-हरनाळी रस्‍त्‍याचे बोगस काम करणा-या गुतेदारावर गुन्‍हे दाखल करा

22

🔹संभाजी बिेग्रेड व मराठा सेवा संघाच्‍या वतिने नव्‍याने केलेल्‍या रस्‍त्‍यावरील खडयामध्‍ये होमहवन करण्‍यात आले

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

बिलोली(दि.5ऑगस्ट):- तालुक्यातील कुंडलवाडी-हरनाळी ३ कि.मी.चार करोडचे काम एका महिण्‍याच्‍या आत पूर्णता डांबर उखडल्‍याने गुतेदार जी.जी.कन्स्ट्रक्शन यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करावी या मागणीसाठी आज दिनांक ४ आगष्‍ट २०२१रोजी संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघच्‍या वतीने या मार्गातील खडयामध्‍ये होमहवन करुन मागणी केली आहे.

कुंडलवाडी-ते-राज्‍यसिमा ७ कि.मी.च्‍या अंतरराजीय मार्ग बांधणीकडे दूर्लक्ष झाले असुन हे मार्ग चार पदरी करण्‍यात यावे कुंडलवाडी-हरनाळी ३ कि.मी. काम बोगस झालेल्‍या कामाची चौकशीसाठी समिती नेमण्‍यात यावी, याच रस्‍त्‍यावरील पुढील ४ कि.मी.मध्‍ये मोठ मोठे खडडे पडल्‍याने पाईचालने सुद्धा आवघड झाले तात्‍काळ खडे बुजवून वाहातूक सुरु करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्‍या वतीने मागणी करण्‍यात आली आहे.

या वेळी केदार पाटील ढगे जिल्‍हा उपाध्‍याक्ष, दता पाटील नागनीकर, जिल्‍हा कार्याअध्‍यक्ष पांडुरंग पाटील हिवराळे तालुका अध्‍यक्ष, प्रशांत पांडे शहरअध्‍यक्ष, माधव पाटील कदम, राज पाटील गादगे,सुरेश पाटील आगळे,परमेश्‍वर पाटील शिंदे, उमेश पाटील गादगे,अरविंद पाटील गादगे,दिनेश पाटील गादगे, विलास पाटील शिंदे,बालाजी पाटील शिंदे,बंटी शिंदे,सुधाकर निदाने,परमेश्‍वर पाटील कंडाळे, गंगा पाटील शिंदे,विकास कांबळे,शंकर होरके,शंकर भंडारे,दादाराव पाटील शिंदे,अरिफ सयद,उमेश पाटील हरनाळीकर,शंकर पाटील शिंदे,राजू पाटील गादगे आदी कार्यकर्ते उपस्थि होते.यावेळी पोलीस कर्मचारी शेख अलिमोद्दीन,गजानन अनमुलवार,इद्रीस बेग यांनी चोख बंदोबस्त ठेवले.