माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघांच्या वतीने महाड पूरग्रस्तांना मदतीचे वाटप

21

✒️अंबादस पवार(विशेष प्रतिनिधी)

मुंबई(दि.5ऑगस्ट):- माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र च्या वतीने राज्यभरातील कार्यकर्त्यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी देणगी निधी जमवला होता. सदर निधीमधून जीवन उपयोगी साहित्य खरेदी करून महाड तालुक्यातील ग्रामीण भागातील पिडीत व गरीब पुरग्रस्तांना महासंघाचे अध्यक्ष सुभाष बसवेकर, रायगड जिल्हयातील पदाधिकारी तुकाराम कंठाळे, रघुनाथ कडू, पुरूषोत्तम पायकोळी व किरण मोरे यांचे हस्ते चार ऑगष्ट रोजी मदत वस्तूच्या कीटचे वाटप करण्यात आले.

महिती अधिकार कार्यकर्ता महासंघांच्या वॉटसॲप ग्रुपवर झालेल्या चर्चे प्रमाणे राज्य भरातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी जमा केला होता.या निधीमधून पुरग्रस्तांसाठी एक चटई,एक ताट वाटी व ग्लास, बेडशीट,मेनबत्ती बॉक्स,काडीपेटी बॉक्स,साबन,पेस्ट ब्रॅश,तेल,मच्छर अगरबत्ती इत्यादी १५ वस्तूंचा मदत कीट तयार केला होता.असे एकूण शंभर किटस चे वाटप महाड तालूक्यातील असनपोई बौदधवस्ती, कामगार वसाहत तसेच सवादगांव कुभांरवाडा येथील गरीब व गरजू पुरगस्तांना चार ऑगष्ट २०२१ रोजी वाटप करण्यात आले.

जेव्हा एका माणसांवर नैसर्गिक संकट येत तेव्हा दुसरा माणूस मदतीला धावून जातो. ही संवेदनशीलता आपण सगळ्यांनी जपली पाहिजे.आपत्ती सांगून येत नाही पण संकटातील माणसांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम आपण निरंतर केलं पाहिजे असा विचार या प्रसंगी सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केला.पिडीत माणसांच्या मदतीसाठी आरटीआय महासंघ सदैव तयार असेल असा विस्वास या प्रसंगी रायगड जिल्हयाचे पदाधिकारी रघुनाथ कउू यांनी व्यक्त केला.मदतीचे वाटत करण्यासाठी स्थानिक भागातील माजी सैनिक सुर्यकांत जगताप यांनी अतिशय सुंदर नियोजन केलें.या प्रसंगी पिडीत पुरग्रस्तांनीही देणगी दिलेल्या सर्व कार्यकर्त्याचे आभार मानले.