नामदार निलमताई गोऱ्हे यांना दादासाहेब गायकवाड  विमानतळ नामकरण समितीचे निवेदन

22

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.6ऑगस्ट):- कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ (ओझर) नामकरण समिती नाशिक यांच्या वतीने बुधवार दि.4 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती नामदार निलमताई गोऱ्हे यांना नाशिक विमानतळास पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांचे नाव देणेबाबत मागणी पत्र समितीच्या पदाधिकारी यांनी दिले आहे.

याप्रसंगी नामदार निलमताई गोऱ्हे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा विषय शासकीय स्तरावर मार्गी लावण्याचे आश्वासन कर्मवीर दादासाहेब गायकवाड विमानतळ(ओझर)नामकरण समिती च्या पदाधिकारी याना देण्यात आले. याप्रसंगी समितीचे 
मुख्य निमंत्रक रिपब्लिकन नेते अण्णासाहेब कटारे,विलास पवार, मदन शिंदे, दिपचंद दोंदे, बाळासाहेब शिंदे, आदेश पगारे आदी उपस्थित होते.