महिला काँग्रेस च्या माध्यमातून १२ दिवसाच्या बाळाची झाली सोनोग्राफी

23

🔸चार दिवसांपासून शासकीय रुग्णालयात बंद होत्या सोनोग्राफी मशीन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.6ऑगस्ट):-महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या माध्यमातून शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे मदत व सल्ला केंद्र सुरू करण्यात आले आहे. दर गुरुवारी महिला काँग्रेस ची टीम शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस करते. आज महिला काँग्रेस च्या प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर या महिला पदाधिकऱ्यां सोबत रूगांची विचारपूस करत असताना, विनोद नैताम नावाच्या इसमाचा १२ दिवसांचा मुलगा आय.सी.यु. मध्ये भरती असल्याचे कळले. या मुलाचा जन्म झाल्यावर दुसऱ्या कग दिवशी त्याला कावीळ झाला, तेव्हापासून हा मुलगा आयसीयूमध्ये ऍडमिट आहे.

दोन दिवसांपूर्वी या मुलाची सोनोग्राफी करण्याची सूचना डॉक्टरांनी दिली, विनोद कितीदा तरी शासकीय रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागात खेटा घालून आला, पण सोनोग्राफी मशीन नादुरुस्त आहे असे कारण सांगून त्याला परत पाठवण्यात आले. सोनोग्राफी करायची म्हणून त्या मुलाला दोन दिवसांपासून दूध पण दिले गेले नव्हते. विनोद ची आपबीती समजल्या बरोबर तत्काळ नम्रता आचार्य ठेमस्कर आपल्या सहकाऱ्यांसोबत रेडिओलॉजी विभागात गेल्या. आणि तिथे उपस्थित पदाधिकाऱ्यांना ना विचारपूस केली असता इंजिनिअर प्रयत्न करत आहे पण मशीन ठीक होत नाही असे उत्तर दिले.

त्यावर ठेमस्कर व सहकाऱ्यांनी जोपर्यंत विनोद च्या बाळाची सोनोग्राफी होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही अशी भूमिका घेऊन मशीन बंद असल्याने रुग्णांना जो त्रास होत आहे त्याची जबाबदारी कोण घेणार?? अशी आक्रमक भूमिका घेतल्या वर, अर्ध्या तासाने एक मशीन सुरू झाली व विनोद च्या मुलाला ऑक्सजिन लावून आणून सोनोग्राफी करण्यात आली त्याच बरोबर अनेक रुग्ण चार दिवसांपासून हेलपाटे घालत आहे पण सोनोग्राफी होत नाही आहे अशा तक्रारी महिला काँग्रेस च्या पदाधिकाऱ्या कडे करू लागल्या शेवटी एक मशीन सुरू झाल्यावर सगळ्या रुगांच्या सोनोग्राफी झाल्या उपस्थित रूगांनी महिला काँग्रेस चे आभार मानले.

या मदत केंद्राच्या माध्यमातून रुगांच्या समस्या सोडवून त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन देण्याची भूमिका महिला काँग्रेस ची आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी दिली. यावेळी महिला काँग्रेस च्या जिल्हा उपाध्यक्षा सुनीता धोटे, सेवादल महिला काँग्रेस च्या अध्यक्षा स्वाती त्रिवेदी, शहर अध्यक्षा लता बारापात्रे, शहर ब्लॉक अध्यक्ष शितल काटकर ,जिल्हा उपाध्यक्षा हर्षा चांदेकर उपस्थित होत्या.