ऑल इंडिया पँथर सेनेच्या केज तालुका अध्यक्ष पदी राजकुमार धिवार यांची निवड

27

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

केज(दि.6ऑगस्ट):-तालुक्यातील शासकीय विश्रामगृह केज येथे ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष नितिन सोनवणे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दलित चळवळीचा बुलंद आवाज दीपक भाई केदार यांनी संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात अन्याय अत्याचारविरुद्ध आवाज उठवला आहे.सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दीपक भाई केदार यांनी मोठा लढा उभारला आहे.

त्यांचे हात बळकट करण्यासाठी के तालुक्यातील शासकीय विश्रामग्रहावर पार पडलेल्या बैठकीत ऑल इंडिया पँथर सेनेच्या केज तालुका अध्यक्ष पदी दलित चळवळीतील खंबीर कार्यकर्ते अन्याय अत्याचाराला वाचा फोडनारे बानसारोळा येथील युवा नेतृत्व राजकुमार धिवार यांची सर्वानूमते निवड करण्यात.शिव,शाहु ,फुले ,आंबेडकर यांचे विचार तळागाळातील लोकापर्यंत पोहचविण्याचे काम करण्यासाठी व ऑल इंडिया पँथर सेनेचे केज तालुक्यात संघटन वाढविण्यासाठी धिवार राजकुमार ऑल इंडिया पँथर सेनेच्या केज तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

गोरगरीब कष्टकरी व बहुजन समाजावर अन्याय करणाऱ्या विरुद्ध लढण्यासाठी धिवार राजकुमार यांची निवड केली आहे.निवड करण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष नितिन सोनवणे होते. धिवार राजकुमार यांची नियुक्ती पत्र देवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी पत्रकार अजय भांगे, पत्रकार महादेव काळे,अशोक गायकवाड ,पत्रकार रजिंत घाडगे ,नितिन सोनवणे अनिल वैरागे, कुडंलिक गायकवाड उपस्थित होते.