यळकोट यळकोट जयमल्हारच्या गर्जनात मेंढपाळांचा तहसीलवर मोर्चा…

21

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

बिलोली(दि.7ऑगस्ट):- तालुक्यातील मेंढपाळांच्या अनेक मागण्या संदर्भात वेळोवेळी प्रशासनाला कळवुनही प्रशासन काहीच कार्यवही न केल्याने जयमल्हार सेनेच्या वतीने आपल्या शेकडो मेंढ्यासह यळकोट..यळकोट जयमल्हारची गर्जना करीत बिलोलीच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.दि.६ अॉगस्ट २०२१ रोजी मल्हार सेनेच्या वतीने तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या मेंढपाळच्या मागण्या संदर्भात हा मोर्चा काढण्यात आला होता.मोर्चाचे नेतृत्व जयमल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी केले आहे.

तालुक्यातील मेंढपाळावर होत असलेला अत्याचार त्वरीत थांबवणे,गावगुंड दरोडे खोरापासुन संरक्षणासाठी बंदुकीचा परवाना देणे,विविध रोगामुळे मेंढ्यांचा मृत्यू झाल्यास मेढपाळांना नुकसान भरपाई देण्याची तरतुद करावी,वनक्षेत्र व गायरान जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रम तात्काळ हटवणे,क प्रवर्ग वनक्षेत्रात मेंढ्या चारवण्यासाठी परवानगी देणे,या मागणीचे निवेदन यावेळी संबंधीत अधिका-यांना देण्यात आले आहे.यापूढे मेंढपाळांना न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जय मल्हार सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी जयमल्हार सेनेचे सरसेनापती लहूजी शेवाळे,एकनाथराव धमणे,जयमल्हार सेना विधानसभा प्रमुख शिवकांत मैलारे,विठ्ठल खोडे,गंगाधर साखरे,रामकिशन भत्ते,साईनाथ बोडके,हणमंत मदनुरकर,गजानन शेळकेे,संदीप काळे,नागोराव शेंडगे,गणेश यलबुगडे,साईनाथ छपेवार,शंकर भंडारे,सयाराम देवाले,मोहन मेढेकर,लालु मैलारे,ज्ञानेश्वर करडे,विश्वनाथ अब्दागीरे यांच्यासह अनेकांनी आपल्या मेंढ्यासह या मोर्चात सहभागी झाले होते.