नंदकिशोर शेरकी यांची शिक्षक भारती नागपूर विभागीय सहसरचिटणीस पदी निवड

22

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.7ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेची सहविचार सभा झूम ॲप द्वारे नागपूर विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर यांचे अध्यक्षतेत आणि विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या सहविचार सभेत मुल तालुक्यातील शिक्षक भारतीचे निष्ठावंत कार्यकर्ते नंदकिशोर शेरकी यांची नागपूर विभागीय सहसरचिटणीस या पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली.

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद घेऊन शिक्षक भारती या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात व म.रा.प्रा.शिक्षक भारती राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांचे नेतृत्वात शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात येत आहेत. शिक्षकांच्या विविध समस्या विधान परिषदेमध्ये मांडून त्या निकाली काढण्यासाठी सरकार विरोधात लढा देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे काम कपिल पाटील सातत्याने करित आहेत.

नागपूर विभागात संघटनेचा कार्यविस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून नागपूर विभागामध्ये शिक्षकांच्या समस्या शासन दरबारी मांडून अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून नंदकिशोर शेरकी यांची नागपूर विभागीय सहसरचिटणीस या पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली.

नंदकिशोर शेरकी यांनी या निवडीचे श्रेय नागपूर विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर, सरचिटणीस सुरेश डांगे यांना दिले आहे.त्यांचे निवडीबद्दल त्यांचे शिक्षक भारती पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.