सावता माळी हे प्रपंचातून देवत्व मिळवणारे एकमेव संत – ह.भ.प. रोहीदास मस्के

21

🔹गंगाखेडला पुण्यतीथी ऊत्साहात साजरी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7ऑगस्ट):- परमार्थातून देवत्व प्राप्त केलेले अनेक साधू-संत आहेत. परंतू आपल्या व्यवसायातून भक्तीयोग साधत देवत्व प्राप्त केलेले सावता माळी हे एकमेव संत होत. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध रामकथाकार ह. भ. प. रोहिदास मस्के महाराज यांनी केले. गंगाखेड येथे माळी समाजाच्या वतीने आयोजीत संत सावतामाळी पुण्यतीथी कार्यक्रमात ते बोलत होते.

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गत वर्षीचा पुण्यातीथी कार्यक्रम रद्द झाला होता. या वर्षी कोरोना नियमांचे नियम पाळत हा कार्यक्रम खडकपूरा गल्लीत घेण्यात आला. मर्यादीत ऊपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात ह. भ. प. नामदेव महाराज रेंगे व ह. भ. प. रोहिदास महाराज मस्के यांचे किर्तन झाले. या प्रसंगी बोलताना रोहिदास मस्के यांनी भक्ती करत असतानाही आपापले कार्य करत राहणे आवश्यक असल्याचे सांगीतले. संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत सेना महाराज, संत गोरोबा कुंभार या सर्व संतांची ऊदाहरणे त्यांनी दिली.

ईतर सर्व संत पंढरपूर वारी करतात परंतू सावता माळी एकदाही पंढरपूरास गेले नाहीत. ‘कांदा, मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी. लसून मिरची कोथींबीरी अवघा झाला माझा हरी’ असे अभंग करत आपल्या शेतातच त्यांनी भक्तीचा मळा फुलवला. यामुळेच विठ्ठल स्वतः त्यांना भेटायला आरण गावात आले. यावरूनच सावता माळी यांची महती सिद्ध होते. आपणही सर्वांना आपापल्या कार्याशी प्रामाणिक राहून भक्ती करणे योग्य असल्याचा निर्वाळा यावेळी ह. भ. प. मस्के यांनी दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाजातील सर्व युवक, कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.