ब्रम्हपुरी येथे ओबीसी संघटनेच्या वतीने मंडल दिन उत्साहात साजरा

19

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.7ऑगस्ट):-7 आँगस्ट 1990 ला तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी यांनी ओबीसींचे हित असलेला मंडल आयोग लागु करण्याची घोषणा केली. हा दिवस देशभरात मंडल दिन म्हणून साजरा केला जातो. ब्रम्हपुरी येथे सुध्दा ओबीसी विद्यार्थी व युवा संघटना व ओबीसी जणगणना समन्वय समीती यांच्या वतीने आज 7 आँगस्ट रोजी शनिवारी मंडल दिन साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाची सुरवात माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्या प्रतीमेचे पुजन व माल्यार्पण करून करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले माजी प्राचार्य तथा ओबीसी अभ्यासक भाऊराव राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, 31 वर्षापूर्वी म्हणजे 7 आँगस्ट 1990 रोजी रोजी तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी.सिंग सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी स्विकारल्या आणि देशाच्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक बदलाला सुरवात झाली. देशातील ओबीसींच्या जीवनात बऱ्यापैकी बदल सुरू झाले.

आता देशात होणाऱ्या जणगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र जणगणना करण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मंगेश देवढगले, मुख्य मार्गदर्शक म्हणून ओबीसी अभ्यासक तथा माजी प्राचार्य भाऊराव राऊत, ओबीसी युवा संघटनेचे राहुल मैंद, वैभव तलमले, स्वप्नील राऊत, निहाल ढोरे, रोशन बगमारे, कनक ठोंबरे,जयगोपाल चोले यांसह अन्य ओबीसी बांधवांची यावेळी उपस्थिती होती.