माकडाच्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी …

20

✒️अशोक हाके(बिलोली,ता.प्र.)मो:-9970631332

कुंडलवाडी(दि.8ऑगस्ट):- येथून पाच किमी अंतरावर असलेल्या मौजे पिपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ नागरिक बाबाराव पाटील साखरे हे दिनांक 31 जुलै रोजी माकडाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
कुंडलवाडी शहर व परिसरात माकड, हरीण, रानडुकर या वन्यप्राण्यांने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असून,या वन्यप्राण्यांचा शेतकऱ्यांसह स्थानिक नागरिकांनाही अतोनात त्रास सहन करावा लागत आहे,याचाच परिणाम म्हणून दिनांक 31 जुलै रोजी पिपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ नागरिक बाबाराव पाटील साखरे वय 70 वर्ष हे माकडाच्या हल्ल्यात घरच्या छतावरून खाली पडून गंभीर जखमी आहे आहेत.

या हल्ल्यात त्यांचा कंबरेला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर नांदेड येथील खाजगी हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत,असे असले तरी या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात निरपराध व्यक्तीं जखमी होत असतील वन विभाग कुंभकर्णच्या झोपेत आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे,आशा गंभीर बाबीकडे संबंधित वन विभागाने त्वरित लक्ष घालून हिंस्र वन्यप्राण्यांना तात्काळ आवर घालावे व संबंधित घटनेचा पंचनामा करुन तात्काळ जखमी झालेल्या व्यक्तींना आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.