जीव मुठीत घेऊन करावी लागते शेती

30

🔹डोंग्यातून करावा लागतो प्रवास रणमोचन येथील शेतकऱ्यांची व्यथा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.8 ऑगस्ट): ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन येथील शेतकऱ्यांना बोळेगाव येथील शेतशिवारात स्वतःच्या मालकीची शेती करायला जाण्यासाठी चक्क! जीव मुठीत घेऊन डोंग्यांने प्रवास करावा लागत आहे.सविस्तर माहिती अशी की ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन गावातील जवळपास अंदाजे 60 ते 70 कास्तकारांची शेती जवळपास बोळेगांव शेतशिवारात अंदाजे दीडशे एकरच्या जवळपास शेतजमीन आहे मात्र स्वतःची शेती करण्यासाठी त्यांना रण मोचन व बोळेगाव यांच्या मधोमध असलेल्या भूतीनाल्यांच्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन पावसाळ्याच्या दिवसात शेती हंगाम करावा लागत आहे.

सदर परिस्थिती लक्षात घेता सदर नाल्यातील दोनशे फूट जागेसाठी त्यांना पण 15 किलोमीटर अंतर पारडगाव वरून कापत जावे लागते नाल्यात खाजगी मालकीची हक्क असलेला डोंगा वासुदेव मेश्राम रमेश ऋषी मेश्राम हे दोन भावंडे चालवत असून त्यांना दान (अन्नधान्य असो की पैसे)स्वरूपात शेतीतील दोन टक्के मिळकतीचा हिस्सा द्यावा लागतो पण आज दिवसांनी दान स्वरूप अधिकाधिक रेट वाढत गेल्याने व डोंग्या ची परिस्थिती बिकट असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने या ठिकाणी पुलिया अथवा नवीन नाव देण्याचे मागणी रणमोचन येथील शेतकऱ्यांनी केली आहे.