आडगाव ते जत्रा चौफुली,के.के.वाघ काॅलेज दरम्यानचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

26

🔹उड्डाणपुल वाहतूकीसाठी खुला करतांना खा. गोडसे

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.9ऑगस्ट):-नाशिक शहराच्या मध्य भागातून मुंबई-आग्रा महामार्ग जात असल्यामुळे शहराचा विकास झपाट्याने होत आहे. शहरातून जाणाऱ्या या महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून वाहनांची वर्दळ वाढली आहे. या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुल उभारण्यात आले आहेत मात्र शहराच्या आडगाव गावाकडे जाणाऱ्या बाहेरील बाजुस अजुनही काही प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी के.के.वाघ ते हॉटेल जत्रा या दरम्यान उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून हा उड्डाणपुल वाहतूक सुरळीत करण्यासाठी निश्चितच मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी येथे केले.

शहरातून जाणाऱ्या मुंबई–नाका, द्वारका, आडगाव नाका, औरंगाबाद नाका, के.के. वाघ महाविद्यालय, अमृतधाम, बळी महाराज मंदीर, जत्रा चौफुली , आडगाव या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे रविवारी (दि.८) खासदार गोडसे यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा कार्यक्रम आडगाव शिवारातील अंबिका टेक्सस्टाईल समोरील उड्डाणपुलाच्या सुरवातीच्या ठिकाणी पार पडला. यावेळी बोलतांना खा. गोडसे यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते बबन घोलप, दत्ता गायकवाड, प्रभाग सभापती प्रशांत दिवे, नगरसेवक,उद्धवबाबा निमसे,नगरसेवक सूर्यंकात लवटे, नगरसेवक आर.डी. धोंगडे, केशवतात्या पोरजे, उत्तम कोठळे, रमेश गायकर, दिलीप मोरे, मल्हारी मते, सुरेश मते, राहुल दराडे, विशाल कदम, अमोल सूर्यवंशी, नाना काळे, हरीभाऊ काळे, सुरेश मते, करण गायकर, रुपेश पालकर,विश्वास तांबे,मंगला भास्कर, शोभा गटकळ, बालाजी माळोदे, पोपट शिंदे, संदीप लभडे,महेश मते, गोकुळ मते, निलेश मोरे, प्रभाकर माळोदे, दस्तगिर रंगरेज, लक्ष्मी ताठे, शैलेश सूर्यवंशी, रोशन आढाव, गोरख खर्जुल, विलास आडके, ज्योती देवरे, सजंय शिंदे, अँड प्रकाश शिंदे, रवींद्र जाधव, अमोल जाधव, विलास मते, सचिन परदेशी, उमेश शिंदे सर, महेंद्र जाधव, गौरव गांगुर्डे, लखन लभडे इरफान सय्यद,यांच्यासह अग्रवाल कंपनीचे प्रकल्प अधिकारी, कर्मचारी आदींसह शिवसैनिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा तसेच सतत होणाऱ्या अपघातांना आळा बसावा, महामार्गावरील वाहतूक वेगाने तसेच विनाअडथळा व्हावी यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या पुलाच्या कामासाठी केंद्राने साडेचारशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे या उड्डाणपुलाची उभारणी नुकतीच पूर्ण झाली. आज रविवारी (दि.८) सकाळी खा. गोडसे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फित कापून उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. वाहतुकीसाठी उड्डाणपुल खुला केल्यामुळे शहरवासियांमध्ये तसेच वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या वाढत्या विस्तारासह वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे या महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्याप्रमाणात निर्माण होत होती. यामुळे शहरातील द्वारका चौक, काठेगल्ली सिग्नल, आडगाव नाका, निमाणी, पंचवटी, औरंगाबाद नाका, अमृतधाम, जत्रा हाटेल, राजबिहारी रोड, लिंक रोड आदी भागात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत होत्या. आता उड्डाणपुल वाहतुकीस खुला झाल्यामुळे शहर आणि शहरालगतचा परिसर वाहतूक कोंडीमुक्त होण्यास मदत होणार असल्याचे खासदार गोडसे यांनी याप्रसंगी सांगितले. के.के. वाघ ते जत्रा हॉटेल या दरम्यानाचा उड्डाणपुलामुळे पंचवटी, आडगाव परिसरातील मुबंई-आग्रा महामार्गावरील वाहतूक सतत सुरळीत राहण्यासाठी निश्चितच मोठी मदत होणार असून हा पुल वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय ठरणार असल्याचा विश्वास खा. गोडसे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.