महाविर नगर पुसद येथे संविधान घराची स्थापना

20

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.9ऑगस्ट):-भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद ,पारमिता महिला मंडळ महाविर नगर व बुद्धविहार समिती महावीरनगर पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ऑगस्ट रोजी संविधान घराची स्थापना करण्यात आली.या कार्यक्रमाचे उद्घघाटन अँड.बुद्धभुषण अप्पाराव मैंद यांच्या हस्ते करण्यात आले.सविधान घरा घरात व समाजातील सर्व जातीच्या लोकांना समजले पाहीजे व आपले हक्क अधिकार कळले पाहीजे या उद्देशाने सविधान घर स्थापन करण्यात आले आहे..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष तथा रिपाई (आठवले) गटाचे शहराध्यक्ष लक्ष्मण कांबळे हे होते.

प्रमुख वक्ते म्हणून प्रा.गोवर्धन मोहीते हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभा शहराध्यक्ष ल.पु. कांबळे ,सुखदेव भगत, गजानन टाले (सरपंच बान्सी),काशिनाथ मुनेश्वर , भगवान बरडे(बौद्धाचार्य) गणपत गव्हाळे , संतोष सुरवाडे परमेश्वर खंदारे , किसन धुळे , (राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे) जिल्हा अध्यक्ष तहसीन खाँन संतोष सोनुने (मुख्याध्यापक)प्रा.आबादास वानखेडे, राजेश ढोले ,कैलास श्रावणे, बि.बि.इंगोले ,अमर पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली यावेळी संविधान घर या विषयावर उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान बरडे यांनी केले. तर सुञसंचालन तुकाराम चौरे यानी केले व आभार प्रल्हाद खडसे यांनी मानले

या कार्यक्रमाला बुद्धविहार समितीचे ,शाम सावळे,देविदास इंगळे, भारत कांबळे ,सागर मंडाले,अनिल इंगळे,गौतम बरडे,संदिप कांबळे,सचिन वाहुळे,शिवाजीराव कांबळे ,बौद्ध महासभेच्या महावीरनगर शाखा अध्यक्षा शांताबाई मंडाले.पारामिता महिला मंडळाच्या संगिता कांबळे, कविता रंगारी,विजयाताई कांबळे,शालुताई बरडे,अल्का मंडाले,निर्मला इंगळे,रमाबाई बरडे,नम्रता इंगळे,कुसुम वाघमारे,सुनिता खिल्लारे,राऊत मॕडम,कावेराताई मुजमुले,ज्योती कांबळे,राखीताई रंगारी, छाया ताई धुळध्वज,बेबी ताई काबळे,शालु कांबळे ,प्रज्ञा वाहुळे,मिनाक्षी कांबळे इत्यादी महीला व पुरुष मान्यवर उपस्थित होते.