एकत्र कुटुंब पद्धत कधी कशी मोडल्या गेली

27

शिक्षणाने माणसात बदल झाला, की प्रगत तंत्रज्ञानाने माणूस बदलला.एकत्र कुटुंबात राहणारा माणूस विभुक्त कुटुंबात का राहायला लागला.एकत्र कुटुंबातील माणूस बदलला हा बदल नक्की कधी व कसा झाला?.चाळीस वर्षापूर्वी मुलगा आईवडीलांच्या शब्दा बाहेर नव्हता,तो आईवडीलांना कोणत्या ही जमा खर्च विचारत नव्हता,की पैशाची देवाणघेवाण करीत नव्हता कारण संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही वडील पार पाळत होते.त्यामुळे शंभर टक्के एकमेकांवर विश्वास होता.त्यामुळेच कुटुंब एकत्र होती.वीस पंचवीस वर्षांपूर्वी नोकरी करणारा मुलगा पगार निमूटपणे वडिलांच्या हातात देत होता.मग वडील त्यातून घरातला काही खर्च करायचे, थोडी बचत केली जायची आणि मुलाला येण्याजाण्याच्या तिकीटापुरते आणि दिवसाला फार तर एक चहा पिता येईल इतके पैसे खर्च करण्यासाठी देत होता.आता आजच्या मुलामुलीला पगार किती मिळतो हे विचारायला आई-वडील कचरतात.मुलगा त्या पैशाचे काय करतो हे विचारण्याची हिंमत किंवा इच्छा आई-वडिलांकडे नसते.

कारण सरळ उत्तर न देतात उलटसुलट उत्तर देऊन मुलगा निश्चितच झगडा करेल,दारू पिऊन येणार ही भीती आईवडीलांना असते.त्यामुळेच हा प्रश्न उपस्थित होतो की आईवडिलांचा आदर न करणारा मुलगा मुलगी कुटुंबात कसा काय तयार झाला.मग एकत्र कुटुंब पद्धत कधी कशी मोडल्या गेली.हा बदल कधी व कसा झाला?.एकत्र कुटुंबातील स्त्री मुलगी डोक्यावरील व छातीवरील पदर खाली पडू देत नव्हती.पायात चपला घालून वडीलधाऱ्या मंडळी समोरून जात नव्हती. शाळा कॉलेज मध्ये जाणारी स्त्री मुलगी सुध्दा पूर्ण शरीर ढाकणारे कपडे घालून जात होती.आता हा बदल कसा झाला.मुलगी शिकली प्रगती झाली.पण धर्म धर्म बंधनातून मुक्त नाही झाली.कपडे घालण्याची मुभा मिळाली.

आजच्या स्रियांना मुलींना कॉलेजमध्ये जाताना साडी ऐवजी पंजाबी ड्रेस घालायला मिळतो याचा आनंद मानणारी मुलगी आता तिच्या मुलीला हाफ पॅन्टमध्ये फिरताना बघते. मनातल्या मनात चरफडते पण स्पष्टपणे मुलीला “अंगभर कपडे घाल” असे म्हणायची हिंमत करत नाही.कारण एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सर्वांचा योग्य मानसन्मान आणि आदर ठेवला जात होता.न ठेवल्यास कडक शिक्षा होत होती.आता ती भीतीच राहिली नाही. त्यामुळेच ती एकत्र कुटुंब पद्धत कधी कशी मोडल्या गेली. हे कोणालाच कधीच समजले नाही.वयात आलेली मुलगी संध्याकाळच्या आत घरात असायची, घरकामात मदत करायची. आता एकदा स्वयंपाक घरात येऊन खायला काय आहे ते बघते आणि स्वतःच्या खोलीत जाऊन परस्पर ऑर्डर करून खायाला मागवते.

हा बदल कुटुंबात कसा व कधी झाला. उच्चशिक्षित लोकांना आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे कळला नाही, तर गरिबांना रोजगार नसल्यामुळे सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करून जेवण बनविणे अशक्य असल्यामुळे हातगाडी वरील पदार्थ खाऊन दिवस काढावे लागतात, मग तीच सवय होते.लग्नाअगोदर मुला-मुलीने एक-दोन वेळा भेटणे म्हणजे पुढारलेपण मानणारे आता नातवंडांचे लिव इन रिलेशनशिप स्वीकारतात.हा शिक्षणामुळे बदल झाला कि संस्कार नसल्यामुळे हा बदल सर्वच समाजात कसा आणि केव्हा झाला?
वर्षातून एकदा होळीच्या वेळी मोठ्या लोकांपासून लपून भांग पिण्याचा कार्यक्रम ठरवणारी आता प्रौढ झालेली माणसं घरातल्या तरुण मुलापुढे सहज ग्लास भरु लागली. देशी इंग्लिश बियर तर घरा घरात पोचली. लग्नाची हळदी राहिलीच नाही.तर फुल्टू धम्माल झाली त्या शिवाय हळदीचा कार्यक्रम कार्यक्रमच राहिला नाही. धर्माचे रीतीरिवाज,परंपरा कुंडली,मुहूर्त भटजीच्या हातून सर्व संस्कारानुसार होत असतांना हा बदल कसा व कधी पासून झाला याचे उत्तर कोणाकडेच नाही.

सोनी,सोनी माक्स,स्टार प्रवाह,जी मराठी,कलर या वाहिन्यावरील मालिका पाहिल्यावर घरा घरात कोणते संस्कार होतील?.उच्चशिक्षित उच्चवर्णीय कुटुंबात होणारा स्वैराचार, व्यभिचार,व्यसनाधीनता प्रतिष्ठेचा दाखविला जात असतो.त्यांचा शेवट होईस्तर वर्ष दोन वर्ष निघून जातात.सुरवात कुठून झाली आणि शेवट काय झाला समजत नाही.पण मालिका लेखिका,दिग्दर्शक,निर्माता,नायक,नायिका,खलनायिका,खलनायक सर्वच दुष्टीने प्रगतीपथावर जातात.पण त्यांच्या मालिकेचा सर्व परिणाम सामान्य माणसांच्या कुटुंबावर होत राहिला.एकत्र कुटुंब पद्धत त्याच्या परिणामामुळे विभक्त झाले असे लिहले तर चुकीचे असणार नाही. नातवंडांना जवळ घेणारी, नातीच्या केसांना तेल लावून देणारी, गोष्टी सांगणारी आजी, आता सकाळी योगा क्लास नाहीतर लाफ्टर क्लासला जाते आणि नातवंडांशी टीव्हीच्या रिमोटसाठी भांडते.हा बदल कोणामुळे झाला.

संस्कार,शिक्षण,विज्ञान,तंत्रज्ञान कसे कसे बदलत गेले.नित्तीमत्ता आणि लोक काय म्हणतील ही भिती आज कोणत्याही समाजात राहिली नाही. सुरक्षित नोकरी करणाऱ्या कुटुंबात किंवा सुरक्षित ठिकाणी उच्च इमारती, बंगले,प्लॉट कोणत्याही ठिकाणी कुटुंबातील माणसाकडे पैसे,गाडी,सोने,चांदी सर्व असतांना कोणीच सुखी समाधानी दिसत नाही. कारण एकत्र कुटुंब नसल्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत असते.
एका इमारतीत राहणारे कुटुंब आजूबाजूला राहणारयांशी कधीच मोकळेपणाने बोलत नाहीत. घरातल्या कोणाशी बोलत नाहीत अशांना कौन्सिलर जवळचा वाटतो. त्याला पैसे देऊन त्याचा सल्ला मानतात. पण स्वतःच्या वडिलधाऱ्या भावंडांवर विश्वास ठेवायला तयार नसतात. तोच प्रकार पैशाच्या व्यवहाराबद्दल. नवरा-बायको दोघेही कमावतात. पण कुठे खर्च झाले, किती गुंतवले, कुठे गुंतवले, ते फक्त सीएला माहित असते. मुलीच्या संसारातले सगळे लहानसहान तपशील जाणून घेणारे आई-वडील, मुलगा आणि सुनेच्या बाबतीत मात्र अलिप्त राहतात. हे ते कुठून शिकले हे तर कोणत्याही शाळा कॉलेजमध्ये शिकविल्या जात नाही.हा एवढा मोठा बदल समाजात कसा झाला.

वडीलधा-यांचा मान ठेवणा-यांच्या मुली नवऱ्याचा येता-जाता अपमान करतात, सगळ्यांसमोर उणं-दुणं काढतात. अशा वेळी मुलीचे आई-वडील मुलीचे ऐकून सर्व निर्णय घेतात.मुलाला मुलाच्या आई-वडीलांना सामोरा समोर बसून घरात घडलेल्या घटनाची चौकशी करावी. आजूबाजूच्या शेजाऱ्यांना कुटुंबातील व्यक्तीच्या स्वभावा,वागणुकी बाबत माहिती घ्यावी म्हणजे साक्षीदार,पुरावे यांची शहनिशा न करता. मुलीच्या वागणुकीचे समर्थन करावे मुलाच्या कुटुंबाशी नाते तोडून कायम तटस्थ वागावे यामुळे होणारे दूरगामी बदल यांच्या परिणामाची परवाच न करणारे उच्चशिक्षित आईवडील हे एकत्र कुटुंबातून आलेले नसतात.त्यामुळेच ते स्वताच्या मुला मुलीवर असेच संस्कार करत असतात.कि ज्यामुळे एकत्र कुटुंब राहणार नाहीत. हा बदल एका दिवसात होत नाही,ही खदखद कायम मुला मुलीत असते.तरुण मुले एक नोकरी सोडतात, दुसरी धरतात. राहत्या गावातून दुसऱ्या गावी जातात. सगळे ठरल्यावर आई-वडिलांना फक्त सांगितलं जातं. त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तर आई-वडिलांना सांगण्याचीही गरज नसते. मित्रांबरोबर ट्रीपला जाणे, ब्रेकअप होणे, सिनेमाला जाणे, पार्टी करणे, स्वतःसाठी नवीन वस्तू, फोन, कपडे वगैरे खरेदी करणे, अशा गोष्टीत आई-वडिलांनी दखल दिलेली मुलांना आवडतं नाही. असं का होतं गेले हे आईवडिलांना सुध्दा कळले नाही.हा बदल एक दिवसाचा महिन्याचा वर्षाचा नाही.

नातेवाईकां कडे जाणं येणे, शेजार्‍यांकडे वेळप्रसंगी जाणं,बसनं, लग्न समारंभात सहभागी होणं, कुळाचार पाळणे, देवळात जाणे, पूजा करणे, इत्यादी गोष्टींवर आता काही घरात नाराजी नाही तर भांडणे होतात.वरून सर्व शांत वाटते पण आत मना मनात खद खद असते.ते बाहेर येण्यासाठी निमित्त हवे असते, एकत्र बसून चर्चा संवाद विचारांची देवाणघेवाण बंद झाल्यामुळे सर्व घरातील टीव्ही वर लक्ष केंद्रीत करतात. आणि टीव्हीवरील मालिका त्याला योग्य खाद्य पुरवत असतात. हा बदल लगेच दिसत नाही, पण परिणाम दाखवतो हे मान्य करावे लागते.
एकत्र कुटुंबात अनेक बंधन असतात म्हणून प्रगती होत नाही असे म्हणतात, मग वेगवेगळे झालेलं कुटुंबातील लोक सुखी समाधानी का नाहीत, ते कायम व्यसनाधीन का असतात. त्यात ते कर्जे बाजारी होतात.मग एक खोटे बोलतात ते लपविण्यासाठी दुसरे ती खोटे,खोटे बोलण्याची संख्या वाढत जाते.त्यामुळेच एकलकोंडे राहण्याची सवय होते.असे लोक कोणत्याही कुटुंबात कुठेही कधीही मन मोकळेपणाने बोलू वागू शकत नाहीत.हा एकत्र कुटुंबापासून वेगळे राहणाऱ्या कुटुंबाची दखल फारशी कोणी घेत नाही, म्हणूनच सर्व समाजात असे बदल घडवून आणल्या जात आहेत, ते भविष्यात गंभीर परिणामकारक असतील.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई,मो:-9920403859