लायन्स क्लब गंगाखेड तर्फे माजी सैनिकांचा सन्मान

23

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.10ऑगस्ट):-शहरातील डॉक्टर लेन परिसरात दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधत प्रा. डॉ. प्रकाश सुर्वे यांच्या प्रेरणेने लायन्स क्लब गंगाखेड टाउन यांच्या वतीने शहर व तालुक्यातील आजी-माजी सैनिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी लायन्स क्लब गंगाखेड टाऊनचे अध्यक्ष अतुल गंजेवार, सचिव गोविंद रोडे ,कोषाध्यक्ष महादेव गीते यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शहीद शुभम मुस्तापुरे यांचे वडील सूर्यकांत मुस्तापुरे, शहीद पुत्र अजय क्षीरसागर, माजी स्वातंत्र्यसैनिक संघटना कार्याध्यक्ष मेजर विश्वनाथ सातपुते ,अध्यक्ष सुभेदार अर्जुन जाधव, अशोक आयनिले, मारुती लटपटे, विष्णू मुंडे, व्यंकटी मुंडे, दगडोबा देवळे, तुकाराम मुंढे ,शंकर गव्हाणे ,संभाजी लांडगे, राम लटपटे, धनंजय मुंडे, नामदेव गुट्टे, माधव फड आदी स्वातंत्र्यसैनिकांचा लायन्स क्लबच्या पदाधिकारी व सदस्य यांच्या तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.

तर सत्काराला उत्तर देताना मेजर विश्वनाथ सातपुते व सुभेदार अर्जुन जाधव यांनी लायन्स क्लबच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली व भविष्यामध्ये कोणत्याही सामाजिक कार्यासाठी माजी सैनिक संघटना लायन्स परिवाराच्या सोबत असेल असे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दगडू सोमानी, केशव देशमुख, बालाजी ढाकणे, रामेश्वर तापडिया, गोपाळ मंत्री ,भगत सुरवसे, जगन्नाथ आंधळे, संभाजी वाडेवाले, उमेश पापडू, विश्वनाथ सोन्नर,विजय बंग, चंद्रकांत गादेवार, संजय सुपेकर, डॉ. रितेश वट्टमवार, हरिश्चंद्र राठोड, ज्ञानेश्वर राजूरकर अभिनय नळदकर, संजय तापडिया, लक्ष्मण वानखेडे ,बालासाहेब यादव,संतोष गुंडाळे ,राजू लांडगे, ज्ञानेश्वर गुंडाळे, तुषार,सचिन दहिवाळ, कापसेदादा, राजेश पाठक,बंडू वाघमारे आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद रोडे तर आभार प्रदर्शन गोपाल मंत्री यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झालासंतोष गुंडाळे राजू लांडगे, ज्ञानेश्वर गुंडाळे, तुषार,सचिन दहिवाळ कापसेदादा,संजय सुपेकर,राजेश पाठक,बंडू वाघमारे