सामाजिक बांधिलकीतुन स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनच्या माध्यमातून आर्थिक मदत कार्य

25

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.10ऑगस्ट):-स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनच्या माध्यमातून कोकण पूरग्रस्तांना छोटीशी साथ देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याप्रसंगी कुमार अजय विनायक मोहिते (अजय चे संपूर्ण कुटुंब दरड खाली गाडल्या गेले.) यांस शिक्षणासाठी मोबाईल घेण्यासाठी मदत स्वतंत्र मजदूर युनियनचे राज्य अध्यक्ष सागर तायडे यांच्या हस्ते देण्यात आली.

त्याप्रसंगी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनचे राज्य अध्यक्ष गीतेश पवार, स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनचे राज्य कार्यध्यक्ष रणधीर आल्हाट, राज्य महासचिव रविंद्र सूर्यवंशी राज्य कोषाध्यक्ष कालिदास रोटे, राज्य कार्यालयीन सचिव निलेश नांदवडेकर, राज्य सह सचिव नरेंद्र पवार, तसेच मुंबईतील इतर पदाधिकारी अमित खरात एस आर जाधव देविदास पवार व चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांची उपस्थिती होती सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

त्याचप्रमाणे ज्या ज्या दानशूर बांधवांनी सामाजिक बांधिलकी समजून आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत केली त्या सर्वांचे स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन च्या वतीने रणधीर आल्हाट यांनी जाहीर मनःपूर्वक आभार मानले .