कृषी विभागा मार्फत जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव सप्ताहाचे आयोजन

43

✒️विशेष प्रतिनिधी(अमोल उत्तम जोगदंडे)

उमरखेड(दि.10ऑगस्ट):-जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कृषी विभागा मार्फत जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे.त्याचाच भाग म्हणून तालुका स्तरावर उमरखेड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर मार्केट यार्ड पुसद रोड उमरखेड .येथे दिनांक 12/ 8 /2021 रोजी तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन केलेले आहे.

आयोजक तालुका कृषी अधिकारी ,व सर्व कर्मचारी वृंद उमरखेड, जिल्हा यवतमाळ. तरी सर्व शेतकरी वर्गांनी आयुर्वेदिक व आहारात या रानभाज्या चा समावेश केल्यास कोणत्याही औषधोपचाराची आवश्यकता भासणार नाही .अशा रानभाज्या ,रानफळ ,औषधी वनस्पती ,यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. तरी शेतकरी ,आदिवासी बांधव व बचत गटांनी आपले स्टॉल या ठिकाणी लावावे .असे आव्हान तालुका कृषी अधिकारी उमरखेड यांनी केले आहे. रानभाजी महोत्सव मार्फत या रानभाज्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत .आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्यांचे वेगळे महत्त्व आहे. शहरातील नागरिकांना रानभाज्यांची ओळख व त्यांची माहिती व्हावी. व या रानभाज्यांची ओळख व त्यांची माहिती व्हावी. व याचा समावेश दैनंदिन आहारात व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

शेतकरीवर्ग ,आदिवासी बांधव या रानभाज्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात. त्यामुळे कोरोना महामारी च्या काळातील त्यांचे आरोग्य उत्तम होते. पचण्यासाठी, स्वास्थ्यासाठी व शारीरिक पोषणासाठी, उत्तम स्वास्थासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी या रानभाज्या चे अतिशय महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी, आदिवासी बांधवांनी ,कृषी मित्राने बचत गटाच्या महिला यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करणाऱ्या रानभाज्यांचे पॅकिंग करून विक्री केले तर ते ग्राहकांना या भाज्यांचा आस्वाद घेता येईल. व त्याची विक्री सुद्धा होईल. ग्राहकांना अतिशय आरोग्यपूर्ण भाज्या उपलब्ध होण्यासोबत शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल .तेव्हा कृषी विभाग मार्फत आगळावेगळा व स्तुत्य असा उपक्रम राबविला जात आहे. तेव्हा शहरी भागातील वर्गांनी व उमरखेड शहरातील नागरिकांनी भेट देऊन रानभाज्यांचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी उमरखेड यांनी केले आहे.