आ.आजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून पुंडी येथे सोळा लक्ष रुपयांची कामे मंजुर

19

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.10ऑगस्ट):- तालुक्यातील पुंडी येथे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून धोबीघाट बांधकामासाठी पाच लक्ष रुपये,गावातील सौर पथदिवे सहा लक्ष रुपये व ओपन जिम साठी पाच लक्ष रुपये असे एकूण सोळा लक्ष रुपये किमतीचे कामे मंजूर झाली.

असून सोमवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी गावाजवळील नदीवर पाच लक्ष रुपये किमतीच्या धोबीघाट कामाचे उद्घाटन सोमवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गण प्रमुख तथा उपसरपंच अर्जुन काकडे यांच्याहस्ते तर ज्येष्ठ नेते शिवाजीराव सुरवसे,सुदाम खांदवे,पंढरीनाथ भालेराव,बळीराम वाडेकर,तुळशीराम थोरवे,दत्तू आंबेडकर,पांडुरंग भालेराव,पोपट थोरवे,नबाजी काकडे,शमोदिन मोमीन,दिलीप थोरवे,रवींद्र देशपांडे,छबुराव दळवी,संदीप जगदाळे,आजिनाथ थोरवे,ज्ञानेश्वर भालेराव,वामन काकडे यांच्या उपस्थित काम सुरू करण्यात आले.आमदार बाळासाहेब आजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून गावागावात विकास निधी देण्यात आला आल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी बोलताना उपसरपंच अर्जुन काकडे म्हणाले की,आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी तालुक्यात विकास कामे सुरू असून कोरोना काळातही कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे.यापुढेही विकास कामे गतीने सुरू राहतील.गावातील प्रमुख समस्या सोडविण्यासाठी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पुंडी ग्रामस्थ उपस्थित होते.