जवाहर नवोदय परीक्षेची पूर्व तयारी बैठक कन्या हायस्कूल बदनापूर येथे संपन्न

31

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)

जालना(दि.10ऑगस्ट):-भारत सरकार अंतर्गत घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय परीक्षेची पूर्व तयारी बैठक कन्या हायस्कूल बदनापूर येथे पार पडली या बैठकीस सर्वप्रथम केंद्र संचालक श्री. खंदारे सर(जे एन व्ही एस परीक्षा) यांनी नवोदय परीक्षा संदर्भात दिनांक 11 ऑगस्ट 2021 रोजी होत असलेली महत्त्वपूर्ण परीक्षा जवाहर नवोदय परीक्षा ही परीक्षा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन भारत सरकार अंतर्गत या परीक्षेचे आयोजन केलेले असून शासनामार्फत वेळोवेळी परीक्षेचे आयोजन केले जाते.

परंतु सद्य:स्थितीत कोविड 19 सारख्या जागतिक महामारी च्या संकटा मुळे एप्रिल मध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलली असल्यामुळे ऑगस्टमध्ये घेण्याचे ठरले असून त्याचा दिनांक निश्चित 11 ऑगस्ट 2021 हा झाला आहे.
सदर प्रसंगी कन्या हायस्कूल बदनापूर येथे परीक्षे संदर्भात श्री.खंदारे सर (केंद्रसंचालक )यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व बैठक व परीक्षेची पूर्वतयारी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकी मध्ये परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन सूचना, नियम इत्यादी चे मार्गदर्शन केंद्रसंचालक श्री खंदारे सर व नागलोत सर यांनी केले. कोविड 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशी महत्वपूर्ण सूचना करण्यात आली.

सर्व पर्यवेक्षकांनी नियमाचे उल्लंघन होणार नाही यासंदर्भात कडक सूचना संबंधितांनी पर्यवेक्षकांना देण्यात आली.तसेच सर्व परीक्षा व्यवस्थितरीत्या पार पाडावी व सर्व पर्यवेक्षकांनी सहकार्य करावे यासंदर्भात मार्गदर्शन केले.

याप्रसंगी बैठकीस उपस्थित पर्यवेक्षक म्हणून श्री आर एस वाघमारे , श्री वाहब शेख श्री प्रमोद सांगळे, श्री सी एम जारवाल श्री के एस झिंजाडे ,श्री एम.आर उनवणे ,श्रीमती नहिरे एस एन,श्रीमती गव्हाणे ए जी, श्रीमती यशवंते एम एस, श्रीमती दौंड जे आर ,श्रीमती शेळके सी के, श्री शिंगाडे आर यु , श्री निकम एम एस , श्री भाकडे व्ही के, श्री चौरे एम बी, श्री साठे एम टी, श्री गावडे पी टी आदींनी उपस्थित राहून परीक्षेसंदर्भात सूचना व माहिती जाणून घेतली.