दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेचा निधी त्वरित देण्याची मागणी

20

🔹रिपाई(ए) आठवले गटाने दिले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.12ऑगस्ट):-कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेमध्ये तालुक्यातील लाभार्थ्यांना जमिनी वाटप करण्यात आल्या. त्या जमिनीतील काही लाभार्थ्यांचा मोबदला अजून नाही मिळाला नाही तो मोबदला त्वरीत मिळण्यासाठी रिपाई आठवले गटाने महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत निवेदन दिले आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड ही योजना सुरू केली असून यामध्ये भूमी नसणाऱ्या मागासवर्गीय लाभार्थ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एकूण चार एकर उमेश कोरडवाहू जमीन दिली आहे .मागील तीन-चार वर्षापासून यवतमाळ येथील सहाय्यक समाजकल्याण आयुक्तात अनेक प्रकरणे धूळखात पडून आहेत .यामध्ये उपविभागीय अधिकारी पुसद येथे झालेल्या मिटिंग मध्ये २६/६/२०१८मध्ये एकूण बारा प्रकरणी पास झाले आहे. यामधील चार प्रकरणे अजून बाकी आहेत दिनांक १८/६/२०१९रोजी पर्यंत २१ प्रकरणे बाकी आहेत. २९/९/ २०१९ मध्ये११ प्रकरणी बाकी आहेत. यामध्ये एकूण २०८ प्रकरणाचा निधी बाकी असल्यामुळे हा निधी त्वरित देण्याची मागणी रिपाई आठवले गटाने महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत निवेदन दिले आहे .

या निवेदनावर रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाठोरे, शहराध्यक्ष लक्ष्मण कांबळे ,राजेश ढोले,समाधान केवटे,प्रा.आंबादास वानखेडे, कैलाश श्रावणे, भिमराव कांबळे,शिध्दार्थ ठोके,प्रकाश धुळे, जयराम माथने,अमर पाटील, दिलीप धुळे, संजय चव्हाण, वसंता वाघमारे, हिरामण हाडसे,गणपत गव्हाळे, तसेच ईत्यादी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.