प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या विभागीय उपाध्यक्षपदी पांडुरंग उणवने

57

✒️बीड विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

बीड(दि.14ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष तथा ना.बच्चु भाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक संतोष राजगुरू यांनी पांडुरंग दिगंबरराव उनवणे यांची संघटनेच्या मराठवाडा विभागीय उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे.

प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर
कर्मचारी संघटना या नावाने अधिकृत नोंदणी असणाऱ्या व ना.बच्चुभाऊ कडू यांच्या विचारांची मशाल हाती घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या संघटनेचे राज्याध्यक्ष तथा स्वीय सहाय्यक संतोष राजगुरू यांनी बीड जिल्ह्यातील सुप्रसिध्द शिक्षक व परखड भूमिका घेणारे,प्रदीर्घ अनुभव असलेले नामांकित शिक्षक पांडुरंग दिगंबरराव उनवणे यांची संघटनेच्या मराठवाडा विभागीय.उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे.

त्यांचा शैक्षणिक अनुभव व सामाजिक बांधिलकीचा संघटनेच्या माध्यमातून निश्चितच शिक्षणक्षेत्राला फायदा होईल,त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा,असे मनोगत संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष राजगुरू यांनी यावेळी व्यक्त केले.

या प्रसंगी संघटनेचे राज्याचे प्रवक्ता दत्तात्रय पुरी उपस्थित होते.त्यांच्या या निवडीबद्दल प्राथमिक शिक्षक संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष भगवान पवार,महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्षा श्रीराम बहीर,शासनमान्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सरवदे,बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड,अपंग संघटनेचे अध्यक्ष अजिनाथ हाडुळे,बाबासाहेब मस्के,बप्पासाहेब देवगुडे,आनंद डावकर,अल्पसंख्यांक संघटनेचे अध्यक्ष शेख मुसा,प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष राजेंद्र खेडकर,कास्ट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब हंगे,शिक्षक सेनेचे अध्यक्ष दिलीप डावकर,संघटक राहुल सुपेकर,बी.एन, गव्हाणे,झेंडे.अविनाश काळे,मदन सोनवणे,धनंजय कुलकर्णी,महेश भट,श्रीकृष्ण जोशी,संघाचे उपाध्यक्ष बिभिषण हावळे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.समाजाच्या स्तरातून विविध शैक्षणिक व सामाजिक संघटनांकडून या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.