मयत संदिप चव्हाण च्या मारेकऱ्यांच्या आठ दिवसात मुसक्या आवळा,अन्यथा जिल्हाभर चक्का जाम आंदोलन-प्रा.पी.टी.चव्हाण

22

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.15ऑगस्ट): -गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी तांड्यावरील गरीब कुटुंबातील ऊसतोड मजुरांचा शालेय विद्यार्थी संदिप चव्हाण याचे आठ दिवसांपूर्वी खुन करण्यात आले आहे, तलवाडा पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करुन आठ दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही, पोलीसांच्या आडमुठ्या व वेळकाढू धोरणाच्या विरोधात आज दिनांक १४.८.२०२१ रोजी गेवराई तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील भेंडटाकळी फाटा येथे बंजारा समाजाच्या वतीने दोन तास आक्रमकपणे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण यांनी केले.

संदिप चव्हाण च्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करा,संदिप चव्हाण च्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देऊन त्यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची अर्थिक मदत शासनाकडून देण्यात यावी,या मागण्यांठी बंजारा समाजाच्या वतीने दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.आठ दिवसांच्या आत आरोपींना अटक करून तांच्या मुसक्या आवळल्या नाहीत तर जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या वतीने बीड जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल,असा इशारा भटके विमुक्त,ओबीसींचे संघर्षशिल नेते प्रा.पी.टी.चव्हाण यांनी पोलिस प्रशासनाला दिला आहे.आंदोलकांसमोर बी. एम. पवार, रमेश पवार, रविकांत राठोड, अनिल राठोड, गणेश चव्हाण यांची भाषणे झाले..

आंदोलन यशस्वी करण्यासाठी सरपंच सर्जेराव जाधव,अण्णासाहेब राठोड,राष्ट्रीय बंजारा परिषदेचे तालुका अध्यक्ष संजय चव्हाण,पवण जाधव,भास्कर राठोड,सचिन जाधव, राजाभाऊ चव्हाण, काशिनाथ राठोड, सतिश पवार, योगेश पवार, एकनाथ आडे,जायकोबा राठोड, सुरेश चव्हाण, विनायक चव्हाण, शरद चव्हाण,आकाश जाधव,मनोज जाधव यांनी मेहनत घेतली.मागण्यांचे निवेदन तलवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नवगिरे साहेब यांना देण्यात आले..
निवेदनावर बाळू राठोड,छगन पवार, सुनील राठोड, रमेश राठोड, ज्ञानेशवर राठोड, विनोद चव्हाण, संजय राठोड, संतोष राठोड,भारत राठोड, संदिप राठोड, एकनाथ राठोड, बाबासाहेब राठोड, यांच्या स्वाक्षरी आहेत..आंदोलनात मयत संदिप चव्हाणचे वडील सोपान चव्हाण,आई राधाबाई चव्हाण यांच्या सह महिला,युवक, विद्यार्थी, विविध संघटनेचे,पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

*क्षणचित्रे*

– जवळपास दोन तास रास्ता रोको आंदोलन सुरू होते.
वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या.

पोलिस व आंदोलनामध्ये शाब्दिक चकमक.काहीकाळ तणाव.
आंदोलनकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

पोलिस व दंगल पथकाची तुकडी तैनात करण्यात आली होती.
पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता..

आंदोलनाच्या निमित्ताने बंजारा समाजाच्या एकजूटीचे दर्शन घडले.

आंदोलनात वीस ते पंचवीस वर्षांच्या युवकांचा अधिक समावेश..

या आंदोलनामुळे गेवराई तालुक्याच्या सामाजिक व राजकीय घडामोडीत बंजारा समाजाची दखल घ्यावीच लागेल एवढ अभुतपुर्व एकीचं बळ अनुभवायला मिळाले.