बेवारस जखमी उंटाला मिळवुन दिला हक्काचा निवारा ; निसर्ग साथी फाऊंडेशन हिंगणघाट चा पुढाकार

19

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.15ऑगस्ट):-हिंगणघाट शहरातील वणा नदी तीरावर बऱ्याच दिवसांपासून एक जखमी उंट फिरत असल्याचे विट भट्टीवर काम करणाऱ्या लोकांचा लक्षात आले ,त्यांनी त्या उंटाचे निरीक्षण केले तर त्याला मोठी जखम होती . ही बाब त्यांनी निसर्ग साथी फाउंडेशन चे गुणवंत ठाकरे यांना सांगितली , आणि लगेच निसर्ग साथी ची टीम उंटा ला पाहण्याकरिता गेली . प्रकाश धानोरकर यांचे शेता जवळ उंटाला पकडून त्याचे निरीक्षण केले.

त्याचा शरीरावर अनेक जखमा होत्या उपचार न मिळाल्यामुळे त्या चिघळल्या होत्या जखमांमध्ये जंतु पडले होतेत्याला दीर्घ उपचारा ची गरज आहे हे ओळखून निसर्ग साथीचे शिलेदार राकेश झाडे ,परिक्षीत ढगे , यांनी त्याचेवर प्रथमोपचार केले ,खायला दिले . निसर्ग साथी फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रविण कडू यांच्याशी चर्चा करून त्याला प्यार फाउंडेशन ऐनीमल रेस्क्यू सेंटर मध्ये दीर्घ उपचारा करिता पाठवायच ठरवीले .उंटाला रात्री ११ वाजता प्राणी रुग्णवहिकेतून रेस्क्यु सेंटर ला नेण्यात आले .श्री देवेन प्यार फाउंडेशन त्याला घेण्यासाठी आले होते .निसर्ग साथी फाउंडेशन जखमी प्राण्यांवर उपचारा करिता नेहमी प्रयत्नशील असते ,कुत्रे,गाय,मोर,उंट ,गाढव, माकड यांचा उपचारा करिता प्रयत्न केला त्यामुळे सर्वत्र निसर्ग साथी फाउंडेशन चे कौतुक होत आहे .