प्रांत अधिकारी यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचा महिला तलाठी चा आरोप

29

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.16ऑगस्ट):-येवला उपविभागीय अधिकाऱ्यांनी तलाठीच्या बदल्या सध्या वादग्रस्त ठरले आहे. यातील काही तलाठी थेट मॅट मध्ये धाव घेतली आहे. मॅटने या निर्णयास 23 ऑगस्ट पर्यंत स्थगिती दिली आहे. तर एका महिलेने उपविभागीय अधिकाऱ्यांनी वारंवार घरी बोलावून शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मराठी महिलेने पैसे मागितल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही महिलांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला दरम्यान उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांनी माझ्यावर केलेले आरोप हे केवळ मला बदनाम करण्यासाठी तसेच दबाव टाकण्यासाठी असल्याचे म्हटले आहे.

आम्ही सुद्धा मॅटमध्ये आमची बाजू मांडण्याची त्यांनी स्पष्टीकरण दिली आहे. येवला येथील तलाठ्यांच्या बदली प्रक्रियेत मनमानी कारभार करत जातीय द्वेष भावनेतुन या बदल्या केल्या असल्याची तक्रार करत काही तलाठ्यांनी विरुद्ध उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांनी आपल्या मनमानी कारभाराने तलाठ्याच्या बदल्या केल्या आहेत. तलाठी बदलीस पात्र नव्हते त्यांच्या बदलीचे आदेश काढले तर ज्या तलाठ्यांनी विनंती बदलीची मागणी केली तर त्यांना दुसरा सजा देण्यात आला तर मर्जीच्या तलाठी ना मात्र त्यांच्या जागेवर कायम ठेवण्यात आले असून ठाण मांड्या मर्जीतील कर्मचाऱ्यावर उपविभागीय अधिकारी मेहरबान असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या बदली प्रक्रिये विरोधात एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे