चंद्रपूर तालुका ग्रामगीता प्रसारक गुरुदेव सेवा मंडळाची कार्यकारिणी घोषित

22

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.16ऑगस्ट):- अ.भा.गुरूदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम व्दारा संचालित आणि मार्गदर्शनात चंद्रपूर तालुका ग्रामगीता प्रसारक गुरुदेव सेवा मंडळाची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी प्रा. रुपलाल कावळे यांच्या हस्ते तुकूम निर्माणनगर येथे सदर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.चंद्रपूर तालुक्यात श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे काम प्रचाराच्या दृष्टीने अधिक जोमाने व्हावे यासाठी गावा-गावात प्रत्यक्ष भेट देऊन पंचवीस गावातील व शहरातील कार्यकर्त्यांना मंडळामध्ये संधी देण्यात आली आहे.प्रत्येक गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे कार्य करणारे गुरुदेव भक्त आहे.

व गुरुदेव सेवा मंडळाचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.त्यांना आतापर्यंत कोणीही संधी प्राप्त करून देण्यात आली नाही. त्यांच्या पर्यंत कुणीही पोहोचले नाही अशी भावना याप्रसंगी व्यक्त केल्यात.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.

तालुका सेवाधिकारी -विजय चिताडे, उपसेवाधिकारी- पुंडलिक खनके, प्रचार प्रमुख- आण्याजी ढवस ,भजनप्रमुख- नथ्थुजी गोहणे ,संघटक -धर्माजी खंगार , उप भजनप्रमुख -नारायण पोतराजे ,सरचिटणीस -बाळकृष्ण झाडे, कोषाध्यक्ष -बंडोपंत धोडरे, महिला प्रमुख-वृंदा हुलके, उप महिला प्रमुख- सुनिता गुज्जनवार ,युवाप्रमुख -रविंद्र पिंपळशेंडे, उपयुवा प्रमुख -धनराज खाडे, कृषीतज्ञ -किशोर कांबळे, कीर्तन प्रमुख- प्रविण नवले, प्रसिद्धी प्रमुख -रंगराव पवार ,उप प्रसिध्दी प्रमुख -विजय नागापुरे,कार्यालय प्रमुख -संतोष कुकडकर, ग्रामीण महिला प्रमुख- वर्षा मोहितकर, शहर महिला प्रमुख -माधुरी बोडेकर, महिला प्रमुख शिक्षण विभाग- प्रज्ञाताई बोरगमवार, महिला प्रमुख आरोग्य विभाग -ज्योती आस्कर, महिला प्रमुख योगा विभाग -प्रतिभा राकडे, महिला प्रतिनिधी -मंजुश्री कासनगोट्टूवार, छाया येरगुडे,नलीनी निखाडे,
सदस्य-शंकर ढेंगळे, ललीता उपरे,गणपतराव कुडे ,गजानन सातपुते,पंढरी नक्षीणे, संजय ताजने, शंकर कोट्टे,ईश्वर अडबाले,भाष्कर वरारकर,सुधाकर पंदीलवार,उध्दव मेश्राम,लटारी तुरानकर,गुलाब बोबाटे, संभाजी मोरे, किशोर घनकसारे,नागेश काकडे, मधुकर बोबडे, पुंजाराम देशमुख, श्रावण जुनघरे, आशा झींगरे,अनिल कंडे, दिलीप उंचेकर, सुनिता वाकडे, ललीता पेटकुले, बाळा चांदुरकर, बेबी कुरेकार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या नवीन कार्यकारिणीचे गुरूकुंज आश्रमचे उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे , प्रांत सेवाधिकारी विठ्ठलराव सावरकर , जिल्हा सेवाधिकारी प्रा.रूपलाल कावळे , सुभाष भाऊ कासनगोट्टूवार,अशोक चरडे आदींनी अभिनंदन केले आहे.