शहरातील अंगणवाड्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू- ना.धनंजय मुंडे

24

🔹स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टचा वजनकाटे भेट उपक्रम

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)

परळी(दि.17ऑगस्ट):- शहरातील क्षेत्रात अधिकाधिक काम उभे करून नागरिकांचे जीवनमान उंचावणे हाच आपला प्रयत्न आहे शहरातील अंगणवाड्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्राधान्य देऊ असे आश्वासन देत स्वर्गीय माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टने अंगणवाड्यांसाठी टाकलेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते शहरातील 64 अंगणवाड्यांना वजन काटे भेट देण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

परळी शहराच्या विविध क्षेत्रात सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने स्व. माणिक बाजीराव धर्माधिकारी चॅरीटेबल ट्रस्ट च्या वतीने राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते शहरातील अंगणवाड्यांसाठी उपयोगी पडणारे वजनकाटे भेट देण्यात आले.या ट्रस्टच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांसाठी उपयुक्त असा उपक्रम राबविल्याबद्दल ना. धनंजय मुंडे यांनी ट्रस्टचे कौतुक केले. गेल्या काही दिवसापासून अंगणवाड्यांचे वजन काटे नादुरुस्त अवस्थेत असल्याने अंगणवाड्यांना वजन काट्यांची नितांत गरज असल्याचे लक्षात आल्याने ट्रस्टच्या वतीने शहरातील 64 अंगणवाड्यांना वजन काटे भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाला न.प.गटनेते वाल्मिकअण्णा कराड, पं.स.सभापती बालाजी (पिंटू)मुंडे,जिल्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी यादव,संगिता तुपसागर,सुरेश टाक, प्रा.डॉ. विनोद जगतकर, अनिल आष्टेकर,गोविंद मुंडे,वैजनाथ बागवाले,जयपाल लाहोटी,अनंत इंगळे,जयप्रकाश लड्डा,दिलीप कराड,रवी मुळे,शरद कावरे, अभिजित तांदळे,चारुदत्त करमाळकर,शशी बिराजदार, रमेश मस्के,बबलू रोडगे,प्रताप समीदरसावळे,राज जगतकर, राजकुमार डाके,प्रताप धर्माधिकारी, धम्मा अवचारे, जितेंद्र नव्हाडे,रजनीताई मोहोड,रोडे ताई आदी उपस्थित होते.

जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी यादव यांनी प्रास्ताविक केले.यावेळी ट्रस्टच्या वतीने माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना अंगणवाड्यां बाबतच्या विविध विषयाची मांडणी केली.आंगणवाडी प्रतिनिधी म्हणून रजनीताई मोहड यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचलन राजकुमार डाके यांनी केले.कार्यक्रमास अंगणवाडी शिक्षिका,सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.