बोरखेडा येथून २५ वर्षीय महिला बेपत्ता, धरणगाव पोलिसांत हरविल्याची नोंद !

21

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.17ऑगस्ट):- धरणगाव पोलीस स्थानकाचे पोलिस हवालदार राजेंद्र कोळी यांनी आज सोमवार रोजी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव पोलीस स्थानकात दाखल मिसिंग रजिस्टर क्रमांक 37 – 2021 दिनांक 13 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले असून सदर महिला सौ.किरण हिंमत मोरे वय २५ वर्ष रा.बोरखेडा तालुका धरणगाव जिल्हा जळगाव या दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास माहेरी पिंप्राळा तालुका जिल्हा जळगाव येथे जात असल्याचे सांगून गेले. मात्र त्या पोहोचल्या नसल्याने कोठेतरी हरवल्या आहेत.

सदर महिला सौ किरण हिंमत मोरे वय 25 वर्ष रंग सावळा, उंची पाच फूट, मध्यम बांधा, चेहरा गोल, डाव्या हाताच्या कामेवर जखमेचे वण, अंगात लाल रंगाची साडी व लाल रंगाचे ब्लाउज घातलेले आहे. कुणासही आढळून आल्यास धरणगाव पोलीस स्थानकाच्या ०२५८८ २५१३३३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन धरणगाव पोलिस स्थानकाच्या वतीने करण्यात आले आहे.