शिवसेनेकडून तालुक्यात नव-नवीन पदनियुक्त्यांनी येणार पक्षाला बळकटी

23

🔹श्री नरेंद्र नरड तालुकाप्रमुख,श्री मिलिंद भणारे उप जिल्हाप्रमुख तर श्री किशोर चौधरी शहरप्रमुख म्हणून नियुक्त

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.17ऑगस्ट):-शिवसेना प्रमुख हिंदु हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री मा.श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख खासदार श्री गजानणजी कीर्तिकर साहेब पूर्व विदर्भ समन्वक मा.श्री प्रकाशजी वाघ साहेब यांच्या सूचनेनुसार चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख मा.प्रशांतदादा कदम यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री नितीनभाऊ मत्ते यांच्या जिल्हा कार्यकारणी ला बळकटी देत वरोरा येथे शिवसेना आढावा बैठकीत ब्रम्हपुरी विधानसभेतील तसेच ब्रम्हपुरी तालुक्यातील पक्ष संघटन मजबूत करण्याकरिता तसेच सामान्य जनतेची कामे करण्या करता ब्रम्हपुरी विधानसभा तसेच तालुक्यातील नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या नियुक्ती पत्र देऊन जाहीर केल्या.

शिवसेना उपजिल्हा प्रमुख ब्रम्हपुरी विधानसभा पदी श्री मिलिंद भणारे, तालुका प्रमुख पदी श्री नरेंद्र नरड, महिला उपजिल्हा संघटिका पदी सौ वीणाताई घोडपागे, शहर प्रमुख पदी श्री किशोर चौधरी, विधानसभा समन्वक पदी फाल्गुन मैद, तालुका संघटक खुर्शीदअली शेख ,उपतालुका प्रमुख पदी श्री पराग माटे, विभाग प्रमुख पदी श्री कवळू पिंपळकर यांच्या नियुक्त्या दि ११/०८/२०२१ रोजी जाहीर केल्या. सर्व पदाधिकारी तालुक्यात पक्ष वाढीसाठी व तळागाळातील सामान्य जनतेच्या हितासाठी पूर्ण जोमाने व प्रामाणिकपणे काम करणार असा ठाम विश्वास नव- नियुक्त ब्रम्हपुरी शिवसेना तालुका प्रमुख, युवा नेतृत्व श्री नरेंद्र नरड यांनी व्यक्त केला.